शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिकेतील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:25 IST

प्रभारी सहायक आयुक्तांची संख्या अधिक

- आशिष राणेवसई : वसई-विरार महापालिकेतील ९ अधिकाऱ्यांच्या शक्रवारी बदल्या करण्यात आल्या. उचलबांगडी करण्यात आलेल्या अधिकाºयांंमध्ये बहुसंख्येने प्रभाग समितीतील प्रभारी सहायक आयुक्तांची संख्या अधिक आहे. प्रशासकीय कामकाजाच्यादृष्टीने या अधिकाºयांंच्या बदल्या करण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी ‘लोकमत’ला दिले. दरम्यान, या बदल्या झालेल्यांमध्ये मुख्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेले प्रशांत चौधरी यांना प्रभारी सहायक आयुक्त म्हणून ‘जी’ प्रभाग समितीत पाठवण्यात आले आहे.तर प्रभारी सहायक आयुक्त म्हणून मुख्यालयात माहिती अधिकार खात्यात असलेल्या दीपाली ठाकूर यांना धानिव/पेल्हार प्रभाग समिती ‘एफ’ प्रभागात प्रभारी सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. लेखापरीक्षण विभागातील अंबादास सरवदे यांना प्रभारी सहायक आयुक्त म्हणून चंदनसार ‘सी’ प्रभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. तर विकास पाडवी हे नालासोपारा (पू.) प्रभाग समिती ‘ड’मध्ये प्र. लेखापाल होते, त्यांना प्रभारी सहायक आयुक्त म्हणून प्रभाग समिती ‘आय’ वसई कार्यलयाचा कार्यभार देण्यात आला आहे. धानीव/पेल्हार ‘एफ’ प्रभाग समितीच्या प्रभारी सहायक आयुक्तपदी असलेल्या दीपक म्हात्रे यांची उचलबांगडी करून त्यांना मुख्यालयातील जाहिरात कर विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सुभाष जाधव यांचीही उचलबांगडी केली असून, त्यांना वृक्षप्राधिकरण विभागात लिपीक म्हणून नियुक्ती केली आहे.सुभाष जाधव वालिव ‘जी’ प्रभागात प्रभारी सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. याशिवाय प्रमोद चव्हाण आणि मनोज वनमाळी यांचीही बदली झाली आहे. चव्हाण चंदनसार ‘सी’ प्रभाग समितीच्या प्रभारी सहायक आयुक्तपदी होते. आता त्यांची रवानगी प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूर स्थानिक संस्था कर विभागात करण्यात आली आहे.तर मनोज वनमाळी प्रभारी सहायक आयुक्त म्हणून वसई ‘आय’ प्रभाग समितीचा कारभार पाहत होते. आता ते नालासोपारा (पूर्व), प्रभाग समिती ‘ड’ प्रभागात प्रभारी लेखापाल म्हणून काम पाहणार आहेत.पालिका आयुक्तांची सक्त ताकीद !या बदल्या पहिल्या टप्प्यातील आहेत. अधिकारी व कर्मचाºयांनी ताबडतोब पदभार न स्वीकारल्यास किंवा रजेवर गेल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त बी जी पवार यांनी दिला आहे.२०० कर्मचाºयांच्या बदलीचे संकेत !पालिका आयुक्त म्हणून पवार रूजू झाल्यानंतर ही पहिलीच खांदेपालट असून महापालिका प्रशासनाकडून अजूनही वर्षोनुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून बसणाºया आणि इतर अशा २०० कर्मचाºयांच्या बदल्या लवकरच करण्यात येणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका