शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पिंजाळी नदीच्या पुलावरून पावसाळ्यापूर्वीच वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 03:36 IST

गतवर्षी महापुरात वाहून गेला होता पूल : ५० दिवसांत पूर्ण केले काम

विक्रमगड : गेल्या वर्षी ४ आॅगस्टच्या मुसळधार पावसामुळे पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथील या नदीवरील निम्मा पूल वाहून गेला होता. तेथे तात्पुरता माती भराव टाकून वाहतूक सुरू केली होती. मात्र, हा भराव पावसात वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती होती. प्रशासनाने हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्याने या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. या पुलाचे २५० फूट नवीन बांधकाम अवघ्या ५० दिवसांत पूर्ण करण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

वाडा-मलवाडा-जव्हार या राज्य मार्गावरील हा पूल वाहून गेल्यामुळे या परिसरातील १५ ते २० गावांचा विक्र मगड-वाडा तालुक्यांशी संपर्कतुटला होता. यामध्ये शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांचे हाल होत असल्याने तुटलेल्या भागात मातीचा भराव टाकून वाहतूक सुरू केली. मात्र, त्यानंतर चार महिले उलटूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षकेले होते.

पुलाचा माती भराव काढून या ठिकाणी नव्याने अधिक गाळे वाढवून पुलाची लांबी वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. या तुटलेल्या पुलाची लांबी वाढवण्यासाठी १० मीटरचे ७ गाळे व १० मीटर संरक्षक भिंत असे एकूण २५० फुटांचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी ३७ लाखांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांनी एप्रिल २०२० मध्ये काढली होती. या कामाचा ठेका विक्रमगड येथील मे.जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर प्रा. लिमिटेड या कंपनीने घेऊन अवघ्या ५० दिवसांत या पुलाचे काम पूर्ण केले.