शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या व्यवसाय कराला व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:34 IST

विश्वासात न घेता कर केला लागू; व्यापारी संघटनांचा आरोप

n  लोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार महापालिकेने सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पालिकेने व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता हा कर लागू केला असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला आहे.महापालिकेने दुकानदार आणि व्यावसायिकांना व्यवसाय कर लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी व्यवसाय परवाना काढावा लागणार आहे. त्यानुसार, परवाना शुल्क आकारले जाणार आहे. वसई-विरारमधील सर्व व्यावसायिक आणि दुकानदारांना व्यवसाय परवाना बंधनकारक आहे. किमान १ हजार रुपयांपासून हा व्यवसाय कर आकारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. शहरात याची जाहिरातही करण्यात आली आहे. मात्र, पालिकेने शहरातील व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी लागू केलेल्या नव्या व्यवसाय कराला शहरातील व्यावसायिकांनी विरोध केला आहे. कोरोना काळात आर्थिक संकट असताना, अचानक हा नवीन परवाना विश्वासात न घेता लागू केल्याच्या तक्रारी व्यापारी संघटनांनी केल्या आहेत.या करामुळे पालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी ६० ते ७० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. मात्र, अचानक परवाना बंधनकारक करण्यात आल्यामुळे व्यावसायिक गोंधळले आहेत. या नव्या परवान्याबाबत व्यापारी वर्गातून विरोधाचे सूर उमटत आहेत. दरम्यान, कायदे अभ्यासक निमेष वसा यांनी महापालिका अधिनियमाच्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून हा नवीन परवानाा लागू केला असल्याचा आरोप केला आहे. ही व्यापाऱ्यांची फसवणूक असून, या विरोधात न्यायालात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालिका मात्र आपल्या या करावर ठाम आहे. व्यापाऱ्यांना याची माहिती दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९, कलम ३७६ (प्रकरण १८)नुसार या कराची आकारणी केली जात आहे. त्यामुळे सर्व विक्रेत्यांना आणि व्यावसायिकांना हा परवाना काढावाच लागेल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार