शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निंबवलीतील गरम कुंडांना पर्यटनाचा दर्जा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:49 IST

वाडा तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत.

वसंत भोईरवाडा : तालुक्यातील निंबवली येथे गरम पाण्याचे झरे ( कुंडे ) असल्याने देश विदेशातील पर्यटक येथे येत असतात. मात्र येथे कोणत्याच सोयी उपलब्ध नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या स्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन या झ-यांचे, कुंडांचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. श्री क्षेत्र अकलोली, वज्रेश्वरी व गणेशपुरी येथे जगप्रसिद्ध गरम पाण्याचे झरे (कुंडे) असून श्री नित्यानंद महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. तर श्री रेणुका, वज्रेश्वरी व कालिका देविंचे येथे प्रसिद्ध मंदिर आहे. त्यामुळे नित्यानंद बाबा व देवता यांचे देश विदेशातील भक्तगण येथे येत असतात. त्यामुळे भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. या क्षेत्राला लागूनच निंबवली हे छोटेसे खेडेगाव असून या गावातही गरम पाण्याचे झरे आहेत. या कुंडावर अंघोळ करण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येतात. यातील एक कुंड अति गरम तर दोन कुंडे सौम्य स्वरूपाची आहेत. अशी तीन कुंडे येथे आहेत. कुंडाचे पाणी हे गंधकमिश्रीत असल्याने त्यात अंघोळ केल्याने अनेक रोग व्याधी ब-या होतात . त्यामुळे अनेक रोगबाधित रूग्ण आवर्जून येथे अंघोळीसाठी येऊन रोगमुक्त होत असतात. तसेच जगभरात कुठेही भूकंप झाला तर या कुंडातील पाण्याची पातळी वाढते व ती अति गरम होतात किंवा भूकंप होण्याअगोदरही येथे बदल जाणवत असतो. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.येथे तीन कुंडे असून ती जशी पूर्वी आहेत तशीच आजही आहेत. महिलांसाठी असलेल्या कुंडासभोवत एका दानशूर व्यक्तीने पत्र्याचा निवारा उभारला आहे बाकी कुंडे पूर्वीपासून आहेत तशीच आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळाचा दर्जा या गावाला दिल्यास विशेष निधी येऊन कुंडांचे सुशोभिकरण होईल व पर्यटक वाढतील अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.