शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

फार्महाऊस पर्यटकांनी झाली हाऊसफुल्ल

By admin | Updated: December 26, 2015 00:26 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी व ३१ डिसेंबर थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी गुरुवार ते रविवार अशी चार दिवस सुटी असल्याने हाच योग साधत गुरुवारपासूनच येथील विविध पर्यटनस्थळे

तलवाडा : नववर्षाच्या स्वागतासाठी व ३१ डिसेंबर थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी गुरुवार ते रविवार अशी चार दिवस सुटी असल्याने हाच योग साधत गुरुवारपासूनच येथील विविध पर्यटनस्थळे व फार्महाऊस मुंबईच्या पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत़ वेळेवर येणाऱ्या पर्यटकांसाठी फार्महाऊसमध्ये जागा उरणार नाही, असे चित्र सध्या आहे़ ज्यांना येथे आज येता आले नाही, त्यांनी अगोदरपासूनच बुकिंग करून ठेवले आहे़ ३१ डिसेंबर हा गुरुवारी असल्याने तो सेलिब्रेशन करण्याकरिता चार दिवसांच्या सुटीचा साऱ्यांनी पसंती दिली़ दरम्यान, हजारो मुंबईचे पर्यटक विक्रमगडमधील विविध ठिकाणच्या फार्महाऊसला मौजमजा करण्याकरिता, नवीन वर्षाचे स्वागत व सेलिबे्रशन करण्याकरिता दाखल झाले असून मिळालेल्या आकडेवारीवरून विक्रमगड तालुक्यात जवळपास ४० ते ५० फार्महाऊस आहेत़ नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विक्रमगड येथील हिरव्यागार आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे आकर्षित होतात़ अवघ्या चार दिवसांवर तो आला असून त्यानिमित्ताने शहरासह ग्रामीण भागातील सर्वच हॉटेल, बार, रिसॉर्ट, फार्महाऊस आणि शासकीय विश्रामगृहे आधीच फुल्ल झाली आहेत़ या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता ग्रामीण पोलीसही सज्ज झाले असून अवैध मद्यधुंद वाहन चालकांना आवर घालण्यासाठी जागोजागी दोन दिवसांपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करणार असल्याचे समजते़ सृष्टी फार्म- आलोडा, रोहन वॉटर पार्क- सजन, चेतना गार्डन- झडपोली, मॅग्नो व्हिलेज- सजन, दिवेकरवाडी- सजन व इतर छोटेमोठे फार्महाऊस मिळून एकंदरीत अंदाजित मिळालेल्या आकडेवारीवरून मुंबईचे ८०० ते १००० पर्यटक रम्य ठिकाणी नवीन वर्षाच्या सेलिबे्रशनकरिता आले आहेत़ (वार्ताहर)विक्रमगड येथील निसर्गरम्य पिकनिक पॉइंट, धबधबे, पर्यटन क्षेत्र परिसर, एकान्त निसर्गरम्य वातावरणात असलेले फार्महाऊस फुल्ल झाले आहेत़ ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून खऱ्या अर्थाने नव्या वर्षाच्या स्वागताला सुरुवात होते़ प्रत्येक जण आपापल्या परीने सेलिबे्रशन करतो़ पर्यटक, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट, नयनरम्य रोषणाईची बरसात करतात. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून लक्ष ठेवणार आहेत.