शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तुंगारेश्‍वर अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटकांना द्यावा लागतो जिझियाकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:54 IST

१२ वर्षांखालील मुलांना २५, त्यावरील व्यक्तींना ४८ रुपयांचा भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसईतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तथा पर्यटनस्थळ असलेल्या तुंगारेश्‍वर अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटक तथा भाविकांना वन विभागाकडून मनमानीपणे आकारण्यात येणारा जिझियाकर आकारून मगच पुढे जावे लागते. १२ वर्षाखालील मुलांना २५ रुपये तर १२ वर्षांवरील व्यक्तींना सुमारे ४८ रुपये आकारले जात असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून आकारण्यात येणारा कर हा मुघल राजवटीत लावल्या जाणाऱ्या कराप्रमाणेच जिझिया करासारखा असून पर्यटकांच्या आणि भाविकांच्या खिशाला सरळसरळ कात्री लावण्याचे उद्योग वन विभागाकडून सुरू झाले असल्याने पर्यटक व भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे. शासनाने ११ जानेवारीपर्यंत हा जिझिया कर बंद न केल्यास शासनाला भाविकांच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

वसईतील तुंगारेश्‍वर हे राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. दूरवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. तसेच तुंगारेश्‍वर पर्वतावर बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रमदेखील असून दररोज भाविकांची वर्दळ असते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आणि भाविकांची वर्दळ वाढली. मात्र या भाविकांकडून ४८ रुपयांची पावती आकारली जात असल्याने तीव्र नाराजी आहे. १२ वर्षांखालील मुलांनादेखील या प्रवेश शुल्काचा सामना करावा लागत आहे.

आताच्या सरकारचीही मनमानी सुरुतत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातदेखील अशा प्रकारे पर्यटक व भाविकांना मनमानी प्रवेश शुल्क आकारले जात होते. त्यानंतरच्या सरकारांच्या काळातही मनमानी थांबेल असा व्होरा होता, मात्र आताच्या सरकारच्या काळातही तेच उद्योग सुरू असल्याने पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.