शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अतिक्रमण हटविण्यासाठी उद्यापासून बेमुदत उपोषण, पर्यावरण संवर्धन समितीचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:53 IST

तरीही वसई उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे हे कारवाई करत नसल्याने उपोषण केले जाणार आहे.

वसई : भुईगाव समुद्र किनाऱ्यावर पाणथळ जमिनीवरील बेकायदा अतिक्र मण प्रकरणी पर्यावरण संर्वधन समिती लढा देत असताना याआधीच या प्रकरणी उच्च न्यायालयानेही वसई महसूल विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही वसई उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे हे कारवाई करत नसल्याने उपोषण केले जाणार आहे.

दरम्यान, वसईच्या पर्यावरण संर्वधन समितीच्या शिष्टमंडळाला मागील आठवड्यात वसई प्रांताधिकारी तांगडे यांनी चर्चेत सहभागी होऊन बेमुदत उपोषण मागे घेण्यासाठी पोलीस, महापालिका, महावितरण आणि वसई महसूल आदी विभागांना बोलावून ही कारवाई महापालिका प्रशासनाने करणे आवश्यक असून यासाठी पोलीस यंत्रणेने त्यासाठी आवश्यक बंदोबस्त देण्याकरिता एक बैठक घेतली होती. मात्र तांगडे यांनी घेतलेली ही बैठक केवळ दिखाऊपणा होता असे कळते. त्यामुळे सपशेल या सर्व यंत्रणांनी वसई प्रांतांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

या संदर्भात समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाणथळ जमीन व तिवरांचे संवर्धन करण्यासाठी वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यात न्यायालयाने ११ जुलै २०१६ रोजी शासनाला वसईतील भुईगाव खारटनातील तिवरांची तोड करून पाणथळ जागेत बेकयदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्या आहेत का? आणि असल्यास याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. यानुसार १८ जुलै २०१६ रोजी सरकारी वकील व तत्कालीन वसई प्रांत दादाराव दातकर यांनी या ठिकाणी तिवरांची तोड करून पाणथळ जागेत बेकायदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी उभारल्याचे मान्य केले.दरम्यान याबाबत संबंधितांना नोटिसा बजावून गुन्हेही दाखल केल्याचे उच्च न्यायालयास सांगितले.

परिणामी न्यायालयाने २५ जुलै २०१६ पर्यंत बेकायदा कोळंबी प्रकल्प, बांधकाम व चाळी जमीनदोस्त करून पाणथळ जागेचे संवर्धन करण्याचे आदेश तर दिले आणि तसे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर करण्यास सांगितले. मात्र मागील ३ वर्षांपासून वसईतील पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना आदी सातत्याने या पाणथळ जागेवरील अतिक्र मण व कोळंबी प्रकल्पाबाबतीत पाठपुरावा करीत आहेत. परंतु ३ वर्षे उलटूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेले नाही.जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीजोपर्यंत पाणथळ जमिनीवर आणि या बेकायदा अतिक्र मणांवर कारवाई करून संबंधित गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत शासकीय अधिकाºयांच्या बेजबाबदार धोरणा विरोधात सोमवारपासून वसई तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणासाठी समिती बसणार असल्याचे समीर वर्तक यांनी सांगितले. आंदोलन प्रसंगी कार्यकरर्त्यांच्या जीवितास कुठल्याही परिस्थितीत काही बरेवाईट घडल्यास त्याला वसई- विरार महापालिका आणि महसूल प्रशासन जबाबदार असेल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार