शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांना टोल फ्री पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:02 IST

भक्तांना दिलासा : गाडीची कागदपत्रे योग्य असल्यास पास मिळणार

विरार : भाविकांचा प्रवास अधिकाधिक सुखद व्हावा यासाठी प्रशासनाने कोकणात गणेश उत्सवाकरीता जाणाºया भाविकांच्या गाड्यांचा टोल मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे भाविकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.

गणेश उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे तर गाव जाण्यासाठी देखील भाविक सज्ज झालेले आहे. गणेश उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर भाविकांची ये-जा सुरु असते. महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक कोकणात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जातात तर टोल नाक्यावर भाविकांना वाट पहावी लागते. तसेच वाहनांची कोंडी होत राहते. तर उत्सवासाठी जाणाºया भाविकांना या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासनातर्फेगणेश उत्सवासाठी जाणाºया भाविकांना टोल फ्री करून देण्यात येणार आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय मार्ग क्र मांक ४८ तसेच नाशिक जिल्ह्यातून येणारे गणेशभक्त यांना राष्ट्रीय महामार्ग क्र .३ वर टोल मोफत करण्यात येणार आहे. गणेश उत्सवाच्या काळात म्हणजेच ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत प्रशासनातर्फे टोल मोफत करण्यात आलेला आहे. आपल्याजवळ असलेल्या वसई आर.टी.ओ कार्यालयात जाऊन टोल फ्री पास घेणे गरजेचे आवश्यक आहे.आर.टी.ओ.कडून हा पास देण्यात येणार असून पास असल्याशिवाय टोल माफ केला जाणार नाही आहे. तसेच आर.टी.ओ. विभागात जाणे शक्य नसेल तर वाहतूक विभागात जाऊन हा पास घ्यायचा आहे. मोटर वाहन विभागाकडून गाडी नंबर, फोन नंबर या सर्वांचा तपास करण्यात येईल व गाडीची कागदपत्र योग्य असल्यास टोल फ्री पास देण्यात येईल.यामुळे भाविकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. मुंबई शहर, पालघर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या जिल्ह्यातून कोकणात जाणाºया भाविकांना हा पास देण्याची प्रक्रि या सुरु झालेली आहे तर वसईकरांना टोल मोफत करण्यासाठीचा पास वसई आर.टी.ओ. कार्यालयात उपलब्ध होणार आहे. 

मोटर वाहन विभागात पास उपलब्ध आहेत. पास देण्याची प्रक्रि या सुरु झालेली आहे. वाहन मालकांनी गाडीचे कागदपत्र आणून पास घ्यायचे आहे. ३० आॅगस्ट ते १२ सप्टेंबर या दरम्यान पास वापरता येईल.- अनिल पाटील,अधिकारी, आर.टी.ओ, वसई