शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

आज नवरात्रोत्सवाची धूम; गरब्याला मिळणाऱ्या प्रतिसादावर होणार विपरीत परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:44 IST

बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे.

पालघर: बुधवार पासून आदिशक्तीचे आगमन होत असून जिल्ह्यात ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे आॅनलाइन अर्ज आले असून त्यातील ७७३ सार्वजनिक आणि २४ खाजगी ठिकाणी मुर्ती स्थापना होणार आहे. देवीच्या आगमनाची व स्थापनेची तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.नुकत्याच शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवानंतर पालघर जिल्हावासीयांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले होते. हा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळे मोठ्या उत्साहाने कामाला लागली आहेत. हा स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जात असल्याने तो पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू आहे. नऊ दिवस चालणाºया या उत्सवामध्ये गरबा, दांडिया खेळण्यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळ्या पोषाखाची खरेदी करून सज्ज झाली असून गरब्याच्या नवनवीन स्टेप्स शिकण्यासाठी कोर्स ही पूर्ण करण्यात आल्याचे विणाली नाईक यांनी लोकमतला सांगितले.बाजारात हार, फुले, धूप, अगरबत्ती आदी पूजा साहित्याच्या खरेदीसाठी तर घट स्थापनेसाठी लागणाºया रंगीबेरंगी घट, देवीचे मुखवटे यांची खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ८३८ सार्वजनिक दुर्गामाता मंडळाचे अर्ज नोंदणी करीत प्राप्त झाले असून ७७३ सार्वजनिक व अन्य रूपात २४ दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. तसेच २० ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रमही साजरे केले जाणार आहेत. हा नवरात्रोत्सवाचा सण शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण आणि विजयकांत सागर ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ११४ पोलीस अधिकारी, १ हजार ४६० पोलीस कर्मचारी,एक एस आरपी कंपनी, २५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राखीव पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास पोलीस बंदोबस्त सज्ज राहणार आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि अवैध धंद्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून संशयास्पद बाबीची माहिती नागरिकांनी पोलिसांना अथवा नियंत्रण कक्षाला द्यावी असे आवाहन केले आहे.आवाज आणि कालावधीच्या बंधनाने तरुणाई झाली नाराजनवरात्रोत्सव व मिरवणूकीमध्ये डिजे वरील बंदी कायम असल्याने आयोजकांना गरबा डान्स स्पर्धा वेळेच्या आत आवराव्या लागणार आहेत. त्यामुळे गरबा प्रेमीत नाराजी आहे. किती व कोणत्या दिवशी गरब्याचा कालावधी वाढेल हे ही अद्याप जाहिर व्हायचे आहे.तरुणाईने तºहेतºहेचे पोषाख आणि दांडिया खरेदी केल्या असल्यातरी १० च्या आतच दांडिया संपवायचा असल्याने व त्याचा आवाजही हळू ठेवावा लागणार असल्याने तिच्यामध्ये नाराजी आहे. याचा परिणाम गरब्याला मिळणाºया प्रतिसादावर होणार आहे.आवाज आणि खेळण्याच्या वेळेवर लादलेली बंधने यामुळे यंदा गरब्याला मिळणाºया प्रायोजकांमध्ये मोठी घट झाली आहे. ही घट संख्या आणि प्रायोजकत्वाची रक्कम अशा दोनही रुपात झाली आहे. आगामी वर्ष निवडणूकीचे असल्याने गतवर्षीपेक्षा यंदा स्थिती बरी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार