शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्सचा आज मोर्चा

By admin | Updated: January 11, 2017 06:05 IST

पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सफाई कामगार, गट प्रवर्तक, वाहन चालक अशा सुमारे १५ हजार

पालघर : पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सफाई कामगार, गट प्रवर्तक, वाहन चालक अशा सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी उद्या (बुधवारी) विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी कामगार संघटनेचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार आहे. श्रमजीवी संघटनेने कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आणला, त्यानंतर विवेक पंडित यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरसकट सगळ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी न धरता त्यांच्याही अडचणी समजून घेण्याची भूमिका घेतली. तळागाळात काम करणाऱ्या या घटकांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे वास्तव समोर आले असून अत्यंत तुटपुंज्या मानधनात हे काम करीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा आणि सुरक्षा नाहीत. आता पर्यंत हे घटक विखुरलेले होते. आपापल्या परीने लढत होते. मात्र सरकार दरबारी या घटकांची साधी दखल सुद्धा घेतली गेली नाही. आता सर्व घटकांच्या न्याय्य हक्काचा लढा उभारून श्रमजीवी कामगार संघटनेने या सर्वांना एकत्र आणले असून उद्या त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे (वार्ताहर)