शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

लाभार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: May 6, 2015 01:21 IST

लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा, तिसरा हप्ता मिळत नसल्याने मंगळवारी पंचायत समिती येथे शेकडो आदिवासी लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.

डहाणू : डहाणू तालुक्याच्या दऱ्या-खोऱ्यात, डोंगरकुशीत राहणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील आदिवासींना शासनाने इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर झालीत. बहुसंख्य लाभार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून घरकुले पूर्ण केलीत. परंतु ग्रामसेवक, शाखा अभियंता, यांच्या उदासीन धोरणामुळे लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा, तिसरा हप्ता मिळत नसल्याने मंगळवारी पंचायत समिती येथे शेकडो आदिवासी लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू आदिवासी मतदारसंघात एकूण ८५ ग्रामपंचायती असून ७० टक्के पेक्षा अधिक प्रमाण आदिवासी समाजाचे आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडच्या भागांत बहुसंख्य ग्रामपंचायत हद्दीत सर्वच आदिवासी राहतात. येथील डोंगर खिंडीत राहणाऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रचंड भ्रष्टाचार होऊ लागल्याने पाच वर्षांपासून शासनाने लाभार्थ्यांनी स्वत: घरकुल बांधण्याचे आदेश दिले. परंतु तालुक्यात शेकडो घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी ग्रामसेवक, शाखा अभियंता संबंधितांकडे भेटच देत नसल्याने असंख्य लाभार्थी दुसऱ्या, तिसऱ्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. मंगळवारी दहयाळ, पावन, कांदरवाडी येथील घरकुल पूर्ण केलेल्या शेकडो लाभार्थ्यांनी अनुदनासाठी पंचायत समिती येथे धडक दिली. येथील ग्रामसेवकांनी शिफारस न केल्यामुळे लाभार्थी तिसऱ्या हप्त्यासाठी वंचित राहिले आहेत. त्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून संबंधितांना जाब विचारला. (वार्ताहर)