शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपत्ये असल्याने वसरे ग्रा.पं. सदस्याचे पद रद्द

By admin | Updated: April 30, 2017 03:51 IST

अपर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी तालुक्यातील खडकोली वसरे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश वामन पडवळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवले आहे.

पालघर/नंडोरे : अपर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी तालुक्यातील खडकोली वसरे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश वामन पडवळे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र ठरवले आहे. त्यांना तीन अपत्य असतांनाही उमेदवारी अर्जातील अपत्यांसंबंधीच्या घोषणपत्रात दोन पेक्षा जास्त मुले नसल्याची खोटी माहिती दिली होती.ग्रामपंचायतीच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत खडकोली-वसरे ग्रामपंचायतीच्या ‘क’ प्रभागातून निवडून आलेले सदस्य रमेश वामन पडवळे यांनी आपत्याबाबत खोटी माहिती सादर केली असल्याने रमेश पडवळे यांना सदस्य म्हणून अपात्र ठरवावे असा पुराव्यानिशी अर्ज प्रकाश शेलार यांनी १० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अधिनियमानुसार १२ सप्टेंबर २००१ नंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणारा उमेदवार ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो सदस्य पडवळे यांना १५ मार्च १९९६ रोजी योगेश व त्यानंतर ३० आॅक्टोबर २००१ रोजी योगिता व १५ नोव्हेंबर २००३ रोजी हेमंत अशी तीन अपत्य झाल्याचा दावा प्रकाश शेलार यांनी आपल्या अर्जात केला असून त्याच्या पृष्ठयर्थ प्रकाश शेलार यांनी ग्रामपंचायतीकडून मिळवलेले दाखले व योगेश या मुलाच्या अनुषंगाने आधार कार्डाअंतर्गतच्या माहितीचा पुरावा जोडलेला आहे. तक्रारदार प्रकाश शेलार यानी अर्ज सादर करून वर्षाचा कालावधी होत आला असून याप्रकरणी आजवर सातवेळा सुनावणी झाल्याचे समजते. पडवळे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पडवळे यांना अपात्र ठरविले. (वार्ताहर)