शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या तिघा फेरीवाल्यांना अटक; महापालिकेची तोडक कारवाई सुरु 

By धीरज परब | Updated: October 25, 2023 18:29 IST

हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे. 

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील दुकानदारावर हल्ला करणाऱ्या २५ ते ३० फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नया नगर पोलिसांनी फेरीवाल्यांच्या एका म्होरक्यासह तिघांना अटक केली. तर हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे. 

शांती नगर सेक्टर १  मधील मायरी दुकान मालक गंगासिंग राजपुरोहीत (६०) यांच्यावर २५ ते ३० फेरीवाल्यांनी हल्ला केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अझहर हैदर शेख (४८) रा. नुपूर, शांती नगर; अब्दुल अन्नान मोहमद सुतार (२४) रा. आलाय घाची, नया नगर व झोएब अल्ताफ शेख ( २५ ) रा. चंद्रेश रेसिडेन्सी, नया नगर ह्या तिघांना पोलिसांनी अटक केली . त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु असून वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. सी. करोडीवाल  तपास करत आहेत. यातील अझहर हा येथील फेरीवालांचा म्होरक्या असून एका माजी नगरसेवकाचा हस्तक असल्याचा आरोप होत असतो. 

फेरीवाल्यांच्या गुंडगिरीचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर ठोस कारवाईची मागणी आमदार गीता जैन व प्रताप सरनाईक सह अनेक माजी लोकप्रतिनिधी आदींनी घटनास्थळी लोकांची भेट घेऊन केली आहे . तर आयुक्त संजय काटकर यांनी घटनेचे गांभीर्य पाहून अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले . 

उपायुक्त मारुती गायकवाड , विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण , प्रभाग अधीकारी स्वप्नील सावंत, फेरीवाला पथक प्रमुख भैरू नाईक सह पालिकेचे कर्मचारी, सुरक्षा बाळाचे जवान आदींनी सोमवार पासून येथील फेरीवाले व अतिक्रमणावर कारवाई चालवली आहे. येथील एका जागेत बेकायदा उभारलेले पत्र्याचे गाळे, जिना आदी तोडून टाकण्यात आले. तर हातगाड्या, बाकडे हे जेसीबीने तोडून टाकण्यात आले आहेत. आता पर्यंत सुमारे १०० हातगाड्या तोडल्याचे स्वप्नील सावंत म्हणाले. तर फेरीवाल्यां वरील कारवाईने हप्तेबाजी बुडाल्याचा राग काही जणांना येत असावा असा टोला लगावत एका पालिका अधिकाऱ्याने दुकानदारांचे शेड सुद्धा तोडू असे नेहमीचे धमकीतंत्र चालवल्याची गोष्ट आयुक्तांच्या कानावर घातल्याचे आ. जैन यांनी सांगितले. 

आ. प्रताप सरनाईक यांनी सुद्धा बुधवारी आयुक्त काटकर यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली.  तर फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. गेल्या अनेक वर्षां पासून नागरिकांनी फेरीवाल्यांच्या मुजोरी, गुंडगिरी व होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी चालवल्या असल्याचे हितेंद्र आचार्य, मिलन भट, आदींनी सांगितले.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड