शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नालाासोपाऱ्यात तीन लुटारुंची टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:50 IST

बँकेतून मोठी रक्कम काढणाऱ्यांना करायचे टार्गेट; १२ गुन्हे उघड, लाखोचा मुद्देमाल जप्त

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील वालीव, माणिकपूर, नालासोपारा, विरार या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाडीची काच फोडून, मोटार सायकलच्या डिक्कीमधून, बँकेच्या बाहेरून तसेच कारचे आॅईल लिकेज झाल्याचे सांगून अनेकांचे पैसे चोरणाºया तीन जणांच्या टोळीस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे त्याचा शोध घेत आहे. या टोळीकडून पोलिसांनी १२ गुन्हे उघड केले असून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड जप्त केली आहे.वसई पूर्वेकडील एव्हरशाईन येथील बँकेच्या बाहेर दोनजण संशयितपणे उभे असल्याचे सागर यादव आणि सचिन दोरकर या पोलिसांना दिसले. त्यांच्याजवळ जाऊन विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना संशय आला. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यावर गाडीची काच फोडून, मोटार सायकलच्या डिक्कीमधून, बँकेच्या बाहेरून तसेच कारचे आॅईल लिकेज असे सांगून अनेक लोकांचे पैसे चोरल्याची कबुली दिली. रतन नारायण गुंजाळ (४६), सुनील नारायण गुंजाळ (३५) आणि कोटेश शामल गायकवाड (४६) या तिघांपैकी दोघांना पकडले असून यांचा एक साथीदार अद्यापपर्यंत फरार आहे. त्यांनी एकूण १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी या टोळीकडून चोरी करण्यासाठी लागणारे हत्यारे, मोटार सायकल, सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी दक्षिणेतील असून महाराष्ट्रात अशा अनेक टोळ्या धूमाकूळ आहे. या टोळीने ठाणे, नवी मुंबई, पालघर, गुजरात याठिकाणी अनेक चोºया केलेल्या असून अनेक वेळा जेलमध्ये गेलेले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले आहे. कोटेश गायकवाड या टोळीचा मोरक्या असून त्याच्यावर ६ ते ७ गुन्हे दाखल असून जेलमध्येही शिक्षा भोगलेली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार मनोज मोरे, सागर यादव, सचिन दोरकर, राजेंद्र फड, महेश जाधव, तुकाराम माने, संतोष शेंडे, बालाजी गायकवाड, सचिन बळीद आणि भीमगौंडा व्हसकोटी या टीमने ही टोळी जेरबंद केली आहे.बायकोचा वाढदिवस होताभिनारचे माजी उपसरपंच रुपेश वसंत पाटील यांनी पत्नीचा वाढदिवस १७ एप्रिला असल्याने ज्वेलर्समधून १ लाख २१ हजार रुपयांचा ३ तोळे २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ४३ हजार रु पये किंमतीचे कानातील दीड तोळे वजनाचे झुमके, ८ हजार रुपयांची अर्धा तोळे वजनाची सोन्याची रिंग आणि ४ हजार ५०० रु पये किंमतीचे पैंजण असे एकूण १ लाख ७६ हजार ५०० रु पयांचे सोन्याचांदीचे दागिने विकत घेतले व नंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कार पार्क करून समोरच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले व दागिन्यांची बॅग गाडीतच ठेवली. याच टोळीने गाडीच्या खिडकीची मधली काच फोडून गाडीतील दागिने चोरी केले होते.