शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे भरपाईसाठी साडेतीनशे अर्ज

By admin | Updated: July 9, 2017 01:14 IST

डहाणूतील वीज वितरण कार्यालयात सध्या ग्राहकांच्या तक्र ार अर्जाचा ओघ सुरू आहे. वीज तंत्रातील बिघाड अथवा वाढीव वीज बिलाचे आकडे कमी करण्यासाठी

- अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणूतील वीज वितरण कार्यालयात सध्या ग्राहकांच्या तक्र ार अर्जाचा ओघ सुरू आहे. वीज तंत्रातील बिघाड अथवा वाढीव वीज बिलाचे आकडे कमी करण्यासाठी या तक्र ारी नसून त्या म्हणजे अविरत ३४ तास पुरवठा खंडित राहिल्याने साडेतीनशे ग्राहकांनी नुकसानभरपाईसाठी केलेले दावे आहेत. डहाणू शहरात ३० जून रोजी सकाळी १० वाजता वीज खंडित झाली होती. त्यानंतर तब्बल ३४ तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाला. पावसाळ्याच्या हंगामात रात्री अंधारात काढाव्या लागल्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागला. रोजगारावरही त्याचा परिणाम झाल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे भरपाई मिळावी या करीता डहाणू शहराच्या पश्चिमेला असलेल्या रेल्वे स्थानक परिसर, बस आगार, इराणी रोड या परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या सुमारे ३५० वीज ग्राहकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या करिता वीज कायद्यातील एमईआरसी २०१३ च्या कलमानुसार प्रतितास ५० रु पयांप्रमाणे ३४ तासांचे १७०० रु पये मिळावेत असे ग्राहकांचे म्हणणे आहे. सोसायटी फॉर जस्टीस ही संस्था या प्रकरणात ग्राहकांच्या बाजूने उभी राहिली आहे. दरम्यान या प्रकरणा विषयी डहाणू वीज कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता बी. एस. धोडी यांच्याशी संपर्क साधला असता ग्राहकांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र, ३० जून या काळात तालुक्यात वादळीवाऱ्याने हा वीज पुरवठा खंडित झाल्याने नैसिर्गक आपत्ती असताना ही तरतूद लागू होत नाही. त्यामुळे अशी कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याचे लेखी उत्तर पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.नुकसान भरपाईची मागणी करणारे अर्ज वीज ग्राहकांनी कार्यालयाकडे पाठवले आहेत. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीकाळात ती तरतूद लागू नसल्याने त्यांना लाभ मिळणार नसल्याचे उत्तर पत्राद्वारे ग्राहकांना पाठविले जाणार आहे. -बी. एस. धोडी, उप कार्यकारी अभियंता, महावितरण (डहाणू)