शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

डहाणूतील तीन शेतकरी इस्त्रायलला, निम्मा खर्च कृषी विभागाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 04:28 IST

निम्मा खर्च कृषी विभागाचा : बळीराजांमध्ये उत्साह, मिळणार शेतीचे नवे धडे

बोर्डी : राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे२२ ते २८ फेब्रुवारी या काळातील इस्त्रायल कृषी अभ्यास दौऱ्याकरिता तालुक्यातील स्नेहल अनंतराव पोतदार (जामशेत), देवेंद्र गोविंद राऊत(नरपड) आणि प्रवीण वासुदेव बारी (कंक्राळी) यांची निवड झाली आहे.

इस्त्रायलमधील जमीन रेतीमिश्रीत असून सिंचन व्यवस्था व पॉलिहाऊस या नव्या तंत्रज्ञानातून कमी जागेत फळे व भाजीपाल्याचे विक्र मी पीक घेण्याची किमया येथील शेतकºयांनी केली आहे. त्यासह फळं-भाजीपाल्याचे प्रोसेसिंग व मार्केटिंग आदीवर त्यांची हुकमत आहे. हे ज्ञानभारतीय शेतकºयांना व्हावे, म्हणून शासनाच्या तालुका कृषी विभागातर्फे डहाणूतील या शेतकºयांची निवड केली आहे. या करिता शासनाकडून ६० हजार रु पयाचे अनुदान देण्यात येत आहे. तर उर्वरीत ६० हजार ५०० रुपयांचा खर्च स्वत: शेतकºयाने करायचा आहे. निवडलेल्या शेतकºयांचा अभिनंदन सोहळा सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी संतोष पवार, मंडळ कृषी अधिकारी अनिल नरगुलवार, शिवाजी इंगळे आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.या देशाच्या शेती क्षेत्रातील विविध आधुनिक प्रयोगाची माहिती दौºयातून मिळणार आहे. शेतीतील संशोधनासह यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानातून अवगत केलेल्या विकासातून जगापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. या अभ्यासातून मिळणाºया अनुभवाद्वारे शेतकºयांच्या ज्ञान शाखा विस्तारतील, त्याचा वैयक्तिकतेसह अन्य शेतकºयांना फायदा होईल असे मत कृषी अधिकारी संतोष पवार यांनी व्यक्त केले. बदलत्या वातावरणात व यंत्राच्या मदतीने शेती प्रगत करण्याचे तंत्रज्ञान या देशाच्या शेतकºयांनी प्राप्त केले आहे. निवड झालेले प्रयोगशील शेतकरी ते आत्मसात करतील असा विश्वास मंडळ अधिकारी अनिल नरगुलवार यांना आहे. तर आमची निवड सार्थ ठरवू असे तिन्ही शेतकºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.परदेशी अभ्यास दौºयाकरिता मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. तेथील पीक पद्धतीची तंत्रज्ञानाशी सांगड घालून केलेला विकास शिकण्यासारखे आहे. वैयक्तिक आणि सामूहिकरित्या शेतकºयांना लाभदायक ठरावा म्हणून प्रयत्न करणार.-देवेंद्र राऊत,निवडलेले शेतकरी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार