शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये अवलिया पीर शहा सद्रुद्दीन चिश्ती यांचा आजपासून तीन दिवस शाही उरूस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:45 IST

- हुसेन मेमन जव्हार : जव्हारची शेकडो वर्षाची परंपरा असलेला व हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेला अवलीया पीर शहा सद्रुद्दीन बद्रुद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांचा ५६५ वा उरूस सोमवार पासून सुरू होणार असून तो बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.पहिल्या दिवशी बाबांचा संदल तर दुसºया दिवशी शानदार ...

- हुसेन मेमन जव्हार : जव्हारची शेकडो वर्षाची परंपरा असलेला व हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेला अवलीया पीर शहा सद्रुद्दीन बद्रुद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांचा ५६५ वा उरूस सोमवार पासून सुरू होणार असून तो बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.पहिल्या दिवशी बाबांचा संदल तर दुसºया दिवशी शानदार चादर मिरवणूक, रातीफ खेळ व रात्री येणाºया जव्हारमधील सर्व हिंदु-मुस्लिम व पाहुण्यांसाठी लंगर (भंडारा) चे आयोजन व रात्री कव्वालीचा शानदार मुकबला व तिसºया दिवशी शाही परंपरा असलेले राजे यांच्या हस्ते जुना राजवाडा येथे झेंडा फलक व ख्वाजा गरीब नवाज यांचा संदल शरीफ असे कार्यक्रम पार पडणार आहेत. याकरीता उर्स जलसा कमेटीतर्फे गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू होती. लाखो भाविक या ऊरुसात सहभागी होतात. दर्गाह रोडवर लायटींगची व्यवस्था, मंडपाची, स्टेजची व्यवस्था, तर ठिकठिकाणी लागणारी दुकाने आदिची व्यवस्था उर्स जलसा कमेटीचे अध्यक्ष अलताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास गेली आहे.तसेच एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर विविध पाळणे व इतर दुकाने येण्यास सुरवात झालेली आहे, एस. टी. स्टॅन्डच्या ग्राऊंडवर पावसामुळे नेहमी चिखल होत असे, त्यामुळे उरूसात येणाºया लोकांना खूपच त्रास होत होता, तो टळावा यासाठी नगर पालिकेने ग्राऊंडवर खडी व माती मुरूमाचा भराव घालण्यात आलेला आहे.त्यामुळे यंदाच्या उरूसामध्ये पाऊस आला तरी ग्राऊंड मध्ये चिखल होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आलेली आहे. हा ऊरुस शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.