शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीकर खात्याला गंडा घालणारे तिघे अटकेत

By admin | Updated: January 30, 2016 02:18 IST

खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना करात सूट मिळवण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन करून विक्रीकर खात्याला तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधात

वसई : खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना करात सूट मिळवण्यासाठी बोगस कंपन्या स्थापन करून विक्रीकर खात्याला तब्बल १ कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून महिला आरोपी फरार झाली आहे.कंपन्यांची नोंदणी करून कोणत्याही प्रकारचा व्यवहार न करता बनावट बिले देऊन त्याबदल्यात व्यापाऱ्यांकडून एक टेफी वसूल विक्रीकर खात्याचा १ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विक्रीकर खात्याकडून रजनीकांत पारेख, हंसा पारेख, अजय पारेख, प्रकाश कोठारी यांच्याविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रजनीकांत, अजय आणि प्रकाश यांना अटक करण्यात आली आहे. तर, हंसा पारेख फरार झाली आहे.रजनीकांत पारेख याने फॉरेवर एंटरप्राइजेस, अजय पारेख याने तुलीप एंटरप्राइजेस, हंसा पारेख हिने इलाइट एंटरप्राइजेस आणि प्रकाश कोठारीने कोठारी एंटरप्राइजेस, पद्मावती डाइज अ‍ॅण्ड केमिकल्स या नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्यांतून कधीही खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. व्यवहार करण्यासाठी लागणारी यंत्रणा, कर्मचारी, कार्यालय, गोडाऊन, विक्रीचा माल व इतर कागदपत्रे आढळून आली नाहीत. मात्र, कंपनीतून कोणताही व्यवहार न करता व्यापाऱ्यांना बनावट बिले अदा करण्यात येत असत. बिले घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा धनादेश जमा झाल्यानंतर बिलापोटी एक टक्का रक्कम आरोपी घेत असत. त्यामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. रजनीकांत, अजय आणि हंसा पारेख यांनी ७७ लाख ४६ हजार १६६ रुपयांचा विक्रीकराचा अपहार केला आहे. तर, प्रकाश कोठारीने ३२ लाख ५० हजार ५६४ रुपयांचा विक्रीकर अपहार केला असल्याचे तपासात उजेडात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)