शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ६५ विद्यार्थ्यांना प्रवेश नाही : संतप्त पालकांचा जव्हारला विद्यार्थ्यांसह बेमुदत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:26 IST

आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या शैक्षणिक व अन्य सोयीसुविधा मिळत नसल्याने, आदिवासी विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी या नामांकित शाळेची मान्यता रद्द केली.

जव्हार : आदिवासी विकास विभागा अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या शैक्षणिक व अन्य सोयीसुविधा मिळत नसल्याने, आदिवासी विकास विभागाने पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी या नामांकित शाळेची मान्यता रद्द केली. मात्र तीन महिने उलटूनही ती मधील आदिवासी विद्यार्थ्यांचे समायोजन केले नसल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवार पासून येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर मुलांसमवेत बेमुदत उपोषणास सुरवात केली आहे.जव्हार व डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातील ६३ आदिवासी विद्यार्थी इंग्लिश माध्यमातील शिक्षण घेण्यासाठी सन २०१५-१६ या वर्षात पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रज्ञान बोधिनी इंग्लिश मिडियम शाळेत पहिलीत दाखल केली होती. या वर्षी हे विद्यार्थी इयत्ता ४ थीत गेले आहेत. मात्र या शाळेत विद्यार्थ्यांना राहणे, खाणे व शैक्षणिक सुविधा, धड मिळत नाहीत अशा विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आदिवासी विकास विभागाने फेब्रुवारी महिन्यात या शाळेची मान्यता रद्द केली. त्या विद्यार्थ्यांना अन्य शाळेत प्रवेश दिला जाईल असे आदिवासी विकास प्रकल्पाने पालकांना सांगितले.शाळा सुरु होवून तीन महिने उलटले तरीही या विद्यार्थ्यांचे कुठेच समायोजन झाले नाही. तसेच आदिवासी मुलांच्या पालकांनी अनेक वेळा जव्हार आणि डहाणू आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला विनंती व तक्रार अर्ज केले. परंतु कार्यााालया कडून कुठलीच दखल घेतली जात नव्हती, तसेच तुमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. असे प्रकल्पाकडून पालकांना सांगण्यात येत होत.तसेच तुमच्या मुलांचे समायोजन आज करू, उद्या देवू असे सहा मिहने उलटून गेले, तरीही या ६३ मुलांचे समायोजन कुठेच केलं नाही.तसेच त्या मुलांच्या पालकांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे लेखी तक्र ार करूनही काहीच उपयोग नसल्याने अखेर जव्हारच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर मुलांसमवेत पालकांनी सोमवार पासूूूनबेमुदत उपोषण सुरु केले आहे.ठाणे कार्यक्षेत्रातील शहापूर तालुक्यातील अघई येथील नामांकित शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, या वर्षातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये आदी मागण्या या पालकांनी केल्या आहेत.महिने झाले तरीही मुलांना कुठल्याच शाळेत प्रवेश नाही.तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.-शिला चौधरी, खरवंद,पालकआम्ही प्रकल्प अधिका-यांना, तसेच आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनाही भेटलो, या मुलांना नामांकित इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश द्या अशी विनंती केली परंतु उपायोग झाला नाही.-विनायक थाळकर,दापटी,पालक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या