शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

थर्टी फर्स्टनिमित्त डहाणूत बुकिंग फुल्ल, पर्यटकांची मांदियाळी : एमटीडीसी नसल्याने आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:18 IST

डहाणू पर्यटनस्थळी हॉटेल आणि रेस्टोरंटची बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. मात्र, लालिफतीत अडकल्याने बोर्डीतील एमटीडीसी जमीनदोस्त झाल्याने परगावतील पर्यटकांना आर्थिक फटका तसेच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : डहाणू पर्यटनस्थळी हॉटेल आणि रेस्टोरंटची बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागणार आहे. मात्र, लालिफतीत अडकल्याने बोर्डीतील एमटीडीसी जमीनदोस्त झाल्याने परगावतील पर्यटकांना आर्थिक फटका तसेच गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.या विकेन्डपासूनच पर्यटक डहाणूत दाखल होत असल्याने सर्वच हॉटेल व रेस्टोरेंटची बुकिंग फुल झाली आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सुरिक्षततेच्या दृष्टीने अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. पारनाका येथील बीचलगत प्रशासनाकडून पार्किंगची सोय करण्यात येत नसल्याने अनेक वेळा वादावादी होऊन भांडणाचे प्रसंग निर्माण होतात. नगर पालिका क्षेत्रा बाहेरच्या हॉटेल्सना महामार्गाचे बंधन पाळावे लागत असून मद्यविक्र ीला परवानगी नाही.परंतु बर्याच ठिकाणी बंदी झुगारून परगावतील पर्यटकांसाठी मद्याची सोय केली जाते. त्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये रोष असून राज्य उत्पादन विभागाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी या काळात हॉटेल्स मध्ये बालमजूर कामाला ठेवले जातात, त्यामुळे या बाबीकडे लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.बोर्डी या पर्यटनस्थळीही सर्वच हॉटेल्सची बुकिंग फुल आहे. येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्टहाऊस सीआरझेडच्या जाळ्यात अडकल्याने मागील चार-पाच वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना महागड्या हॉटेल्समध्ये जाऊन आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय ईच्छा असूनही जागा उपलब्ध नसल्याने मुंबई आण िउपनगरातील पर्यटकांना घरचा रस्ता धारावा लागतो.महाराष्ट्र सागरी मंडळाकडून पर्यटन विकासासाठी तालुक्यातील चिंचणी, नरपड, चिखले, घोलवड आण िबोर्डी या पाच गावांची निवड निर्मल सागरतट अभियानाअंतर्गत करण्यात आली आहे. परंतु शासनाने लाखोंचा निधी देऊन एका वर्षाचा कार्यकाल उलटल्यानंतरही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. या कडे सदर विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टी