आर चला चला म्हूर्त गाठायचा हायं, टाळी सापडाया हवी म्हणत सगळेजण या बोटीत उड्या मारून बसायला लागले तेव्हा त्यांना समजावणारा शिस्त लावणारा, त्यांची मोजदाद करणारा कुणीही तिथे नव्हता सगळ्यांना फक्त जायची घाई होती. बोटी खाजगी असल्यामुळे व्यावसायिक बोटीत रोज जशी प्रवासी संख्या मोजून भरली जाते. तसे करणारे कुणीही नव्हते त्यामुळे सारा अनर्थ झाला. जे बोटीत चढले त्यातले अनेकजण धड बसलेही नव्हते. मागे राहिलेल्यांना हातवारे करून बोलाविण्याच्या नादात कोणालाच बोटीच्या अवस्थेचे भान नव्हते. याचा व्हायचा तोच विपरीत परिणाम झाला. ती अचानक कलंडली आणि सगळेजण पाण्याखाली गेले. क्षणभर काय घडते आहे, ते कुणालाच कळाले नाही. परंतु दुसऱ्यांच क्षणी मच्छिमार, भूमीपुत्र सगळेच सावरले आणि त्यांनी धडाधड खाडीत उड्या टाकल्या. ज्यांना पोहता येत नव्हते त्यांनी पोलीस आणि अग्नीशमन दलाला पाचारण केले. त्यांनीही बचाव कार्याला सुरुवात केली. खाडीचे पाणी खोल आणि गढूळ असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. यावर मात करण्यासाठी स्कूबा डायव्हिंगचा वापर झाला. अॅम्ब्युलन्स धाव घेत्या झाल्या. आसपासच्या रुग्णालयांना सज्जतेचा इशारा दिला गेला. त्यांनीही तो गांभीर्याने घेतला. त्यामुळेच या सगळ्यांच्याच सामुहीक प्रयत्नामुळे काळावर मात करता आली. अनेकांचे प्राण वाचविता आले.
त्यांनी केली ‘काळावर मात’
By admin | Updated: February 29, 2016 01:31 IST