शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

पर्ससीनवाल्यांना रोखण्याचे प्रयत्न थिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:54 IST

जिल्ह्याच्या ११० किमी क्षेत्रासाठी एकच गस्तिनौका : ट्रॉलर्सची छुपी घुसखोरी सुरूच

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सवाल्यांची वाढती दादागिरी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रयत्न थिटे पडत असून, त्यांच्याकडे जिल्ह्याच्या ११० किलोमीटर्स क्षेत्रासाठी एकच गस्तिनौका असल्याने कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ट्रॉलर्सची छुपी घुसखोरी सुरूच असून, ती रोखण्यासाठी शासनाने अन्य एक नौका तैनात करून परप्रांतीय पर्ससीनधारकांच्या दादागिरीचा बिमोड करावा, अशी मागणी केली जात आहे.

महाराष्ट्र शासनाने डॉ. के.व्ही. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने पर्ससीन मासेमारी, राज्याच्या किनाऱ्यावरील पारंपरिक मासेमारी व पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेला अहवाल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने शासनाने पर्ससीन व रिंगसीन मासेमारीसाठी नवीन परवाने देण्यास बंदी घातली आहे. मात्र, एनसीडीसी योजनेतून नौका बांधून त्याचा वापर मात्र पर्ससीनसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले होते.

एकाच नाव आणि नंबरवर दोन-दोन ट्रॉलर्स पर्ससीनची बेकायदेशीररीत्या मासेमारी केली जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. झाई ते मुरुड या क्षेत्रात पर्ससीन मासेमारीला बंदी असताना, सर्रास पर्ससीन ट्रॉलर्स शेकडोच्या समूहाने येत जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांच्या कवी क्षेत्रात धुडगूस घालून त्यांच्या जाळ्यांचे नुकसान करीत आहेत. वसई तालुक्यातील पाचूबंदर येथील एका मच्छीमार बोटीवर समुद्रात जीवघेणा हल्ला केल्यानंतर दोन मच्छीमार जखमी झाले. हा हल्ला झाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यास मत्स्य-व्यवसाय विभागाच्या गस्तिनौकेला शक्य झाले नाही. कारण झाई ते वसई या ११२ किलोमीटर्स अशा विस्तीर्ण समुद्री क्षेत्रात कुठल्याही बेकायदेशीर अथवा संशयास्पद घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचण्यासाठी एका गस्तिनौकेला ७ ते ८ तासांचा अवधी लागतो.  त्यामुळे दुसऱ्या गस्तिनौकेचा प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे सादर करण्याची मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे.

कारवाईत अडचणीnमत्स्यव्यवसाय विभागाला कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे पाचूबंदरच्या मच्छीमारांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेवरून दिसून आले आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागामध्ये असलेल्या उणिवेचा फटका जिल्ह्यातील मच्छीमारांना बसत आहे. nपर्ससीनधारक ट्रॉलर्स मात्र, या उणिवेचा फायदा उचलत स्थानिक मच्छीमारांना मारहाण करून पसार होत आहेत.