शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडच्या आमसभेला चार वर्षात मुहुर्तच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:43 IST

जनतेचा संताप लोकसभेच्या पथ्यावर; विक्रमगड मागतायत आमदारांच्या कामाचा हिशेब

- राहुल वाडेकर विक्रमगड : गेल्या चार वर्षांपासून तालुका पंचायत समितीची एकही आमसभा होऊ शकलेली नाही. ही आमसभा न घेण्याबाबत गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या अचारसंहितेची कारणे पुढे केली जात असली तरी आगामी लोकसभा निवडणूकीवर त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. आमदारांनी केलेल्या कामाचा जनता हिशेब मागत असून आमसभेला गत चार वर्षांत मुहुर्त न सापडल्याने विक्रमगडकर संताप व्यक्त करीत आहेत.२००८ मध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेमध्ये विक्र मगड विधानसभा मतदार संघ तयार झाला. मात्र गेल्या ९ वर्षात तालुक्याचा विकासाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज, रोजगार अशा अनेक समस्या आ वासुन आजही उभ्या आहेत.तालुक्यातील जनतेला आपल्या सार्वजनिक समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी तालुक्याची आमसभा गेल्या चार वर्षांपासून झालेली नाही. आमसभेत घेतलेल्या ठरावांना, तसेच आम जनतेकडून केलेल्या सार्वजनिक कामांच्या सुचनांना अनन्यसाधारण महत्व असते. विशेषत: दरवर्षी होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दोन ते तीन महिने आधी आमसभा घेणे बंधनकारक असते. या आमसभांमधून घेतलेले धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतुद करता येते मात्र, गेल्या चार वर्षात तालुक्यात एकही आमसभा झालेली नाही. गेल्या चार वर्षात विक्र मगड तालुक्यात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विविध कामांमध्ये झालेला लाखो रु पयांचा भ्रष्टाचार, कधी सुका तर कधी ओळा दुष्काळाची शेतकऱ्यांना न मिळालेली भरपाई अशा अनेक मुद्द्यावर येथील जनतेला या तालुक्याच्या आमसभेत मांडायचे होते पण आमसभा न झाल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.आमसभेच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या निकाली लागतात, पण आमसभा न झाल्याने या समस्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे.- संदेश राऊत, सामाजिक कार्यकर्तआमसभा दरवर्षी होणे गरजेचे आहे. जेणे करु ण विक्र मगड तालुक्यातील खेडे-पाड्यातील प्रश्न आमदाराना कळतील. तालुक्यातील आमसभा न झाल्याणे सर्व सामन्याचे समस्या मांडायचे तरी कोणा कडे असा प्रश्न पडला आहे.- लहु नडगे, नागरिकगेल्या चार वर्षात आमसभा झाली नाही. या वर्षी ही आमसभा होणे धूसर आहे. या मागे आमदाराचे काम न करणाºया आधिकाºयाना पाठिशी घालण्याचे धोरण तर नाही ना? त्यात तालुक्यातील अनेक गैरव्यावहार उघड झाले आहेत त्यामुळे आमदारानी आमसभा घेणे गरजेचे आहे. - रविंद्र आयरे, सामाजिक कार्यकर्ते