शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा रुग्णालया’चा दर्जा असलेले एकही रुग्णालय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:20 IST

उपजिल्हा रुग्णालयाचे नऊ महिन्यांपूर्वीच इलेक्ट्रिक व फायर ऑडिट

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्क जव्हार : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या जळित-कांडामुळे महाराष्ट्राचे समाजमन हेलावून टाकल्यानंतर राज्याच्या अन्य जिल्ह्यांतील शिशु केअर सेंटरमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापि, सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या नकाशावर आलेल्या नवीन पालघर जिल्ह्यामध्ये अद्यापही ‘जिल्हा रुग्णालया’चा दर्जा असलेले एकही रुग्णालय अस्तित्वात नाही. मात्र जव्हार, डहाणू आणि कासा येथे तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. 

पालघर हा नवीन जिल्हा सहा वर्षापूर्वी झाला असला तरी एकही जिल्हा रुग्णालय निर्माण करण्यात आलेले नाही. केवळ तीन उपजिल्हा रुग्णालयांत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील एकमेव जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयातील शिशु उपचार केंद्राचे नऊ महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट झाले असून, ते केंद्र सुरक्षित आणि सुसज्ज असल्याचे आरोग्य विभागातील स्थानिक अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात जव्हार, डहाणू आणि कासा ही तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. त्यापैकी जव्हारच्या रुग्णालयातच शिशु केअर युनिट कार्यरत आहे.

अग्निशमनविरोधी यंत्रणा सुसज्ज असल्याचा दावारुग्णालयात अग्निशमनविरोधी यंत्रणांचे सहा संच असून ते कार्यरत असतात तसेच त्यांची मुदत संपल्यावर त्यांना तातडीने बदलण्यात येतात. आतापर्यंत या रुग्णालयात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. रुग्णालयातील अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेचे ऑडिट एप्रिल २०२० मध्ये करण्यात आले आहे. - डॉ. अनिल थोरात,     जिल्हा शल्य चिकित्सक 

कासा रुग्णालयाचे ऑडिट नाही कासा : डहाणूतील उपजिल्हा रुग्णालयाचे अद्याप इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही, मात्र प्रशासनाने तात्काळ ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील आदिवासी भागातील हे ५० खाटांचे हे रुग्णालय असून त्याचे फायर ऑडिट सप्टेंबर २०२० मध्ये झाले आहे. मात्र १४ वर्षांपूर्वी उभारलेल्या या रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट झाले नाही. 

जिल्ह्यात तीन उपजिल्हा रुग्णालयेआदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी तसेच जन्म घेतलेल्या शिशूवर उपचार करण्यासाठी जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतात. तसेच डहाणूतील उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची क्षमता असून कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची क्षमता आहे.

कुटीर रुग्णालयात ४० इनक्युबेटरची व्यवस्था

पालघर जिल्ह्यातील आणि आदिवासीबहुल दुर्गम भागातील एकमेव असलेल्या जव्हार तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय असलेल्या कुटीर रुग्णालयामध्ये साधारण ४० इनक्युबेटरची व्यवस्था आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे आणि लहान बालके तसेच प्रसूतीसाठी आलेल्या महिलांवर वैद्यकीय उपचार करणारे हे ठिकाण आहे.            -  डॉ. रामदास मरांड, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक

माझी प्रसूती शनिवारी झाली असून माझ्या बाळाचे वजन कमी असल्यामुळे त्याला येथे रुग्णालयातील गरम पेटीत ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयामधील सुविधा चांगल्या आहेत, असे माझे मत आहे. तसेच रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारीवर्र्देखील चांगली देखभाल करीत आहेत.       - उज्ज्वला रवींद्र चिपाट,    प्रसूती माता,     आकरे (वांगणपाडा), ता. जव्हार

 

  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर