शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वाड्यात कारखाने हजार पण अग्निशमन दल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:32 IST

मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही.

- वसंत भोईरवाडा - मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र उभारण्यात आलेले नाही. येथील कारखान्यांमध्ये वारंवार आग लागत असून त्या विझविण्यात होणाऱ्या विलंबामुळे कारखान्यांचे कोट्यवधी रुपयंचे नुकसान होत आहे. या पट्ट्यात एक हजारांहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत तरीही अग्निशमन केंद्र नाही.वाडा तालुका डी प्लस झोन जाहीर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून यात अनेक रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षाांच्या कालावधीत तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. डोंगरते येथील जे.आय.के. या रासायनिक कंपनीत रिअ‍ॅटरचा स्फोट होऊन कंपनी जळून खाक झाली. वाडा शहरातील स्वामीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून गिरणी खाक झाली. त्यात २० लाखांहून अधिक नुकसान झाले. वडवली येथे असलेल्या एका कंपनीच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. सापरोडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पराग केमिकल या कंपनीचे ६० लाखांचे नुकसान झाले होते.कोडले येथील फायबर लोन प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिक कंपनी पूर्ण खाक झाली. वसुमती प्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजिंग या कंपनीचे आगीत चार कोटींचे नुकसान झाले. मुसारणे फाटा येथे लाकडाच्या वखारीला आग लागून पंधरा लाखाचे नुकसान झाले होते. वाडा आगाराची एक बस पेटून आणि दोन गाड्यांना त्याची झळ लागून २० लाखांची हानी झाली होती. अशा अनेक घटना घडत असल्याने तालुक्यात अग्निशामक केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.भिवंडी येथूून येतात बंबकोणत्याही कारखान्याला आग लागल्यास अथवा स्फोट झाल्यास आग विझवण्यासाठी ४० कि.मी. लांब असलेल्या असलेल्या भिवंडी अग्निशमन केंद्राचे बंब मागवावे लागतात. त्यांना काही कारणामुळे घटनास्थळी पोहोचायला उशीर होतो. वाडा आणि शेजारच्या विक्रमगड या तालुक्यात आपत्कालीन काळात जीवित तसेच वित्तहानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाची आवश्यकता असल्याचे घोणसई येथील जेराई फिटनेस कंपनीचे व्यवस्थापक दिलीप लाड यांचे म्हणणे आहे.मी वाड्यात नवीन आहे. त्यामुळे याविषयी योग्य ती माहिती घेतो. मात्र, हा महत्त्वाचा विषय असल्याने यासंदर्भात तातडीने काहीनाकाही उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाशी बोलून वरिष्ठ पातळीवर व्यवहार करू.- डॉ. उद्धव कदम,तहसीलदार, वाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार