शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सहा तालुक्यांत शनिवारी नवीन रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:50 IST

जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल : वसई-विरार परिसरातही रुग्णांमध्ये घट

जगदीश भोवड लोकमत न्यूज नेटवर्कपालघर  :  जिल्ह्यामध्ये एकीकडे कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी केली जात असतानाच दुसरीकडे मात्र कोरोना संसर्गाची भीतीही आता हळूहळू कमी होताना दिसत आहे.  शनिवारी जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील वसई-विरार आणि पालघर तालुका या दोनच परिसरामध्ये शनिवारी कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले. वसई-विरारमध्ये नवीन २२ रुग्ण  आढळले तर पालघर तालुक्यामध्ये केवळ तीनच रुग्ण  आढळले आहेत. उर्वरित डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, वाडा या तालुक्यांप्रमाणेच वसई ग्रामीणमध्येही एकही रुग्ण आढळला नाही. 

वसई-विरारमध्ये आजवर  एकूण २९ हजार ३८९ रुग्ण आढळलेले असून २८ हजार २७३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. मात्र त्याच वेळी ८९० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. परंतु आता वसई-विरार क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. शनिवारी नवीन २२ रुग्ण आढळले, तर २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आता पालिका हद्दीमध्ये केवळ २२६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. दुसरीकडे पालघर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांचीही कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झालेली आहे. शुक्रवारी पालघर तालुक्यात तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या पालघर तालुक्यात ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. डहाणूमध्ये शनिवारी नवीन एकही रुग्ण आढळला नसला तरी अद्याप ३६ रुग्ण उपचार घेत आहेत. जव्हारमध्ये १०, मोखाडामध्ये १, तलासरीमध्ये ४, वसई ग्रामीणमध्ये १, विक्रमगडमध्ये १ आणि वाडामध्ये ७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.  बाधित रुग्णांची घटती संख्या आणि बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या लक्षात घेता लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यामध्ये ४३ हजार रुग्णांची कोरोनावर मातपालघर जिल्ह्यामध्ये आजवर ४३ हजार १७ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यातील ३ लाख १२७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून शनिवारच्या अहवालानुसार अद्याप ९६१ जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. सध्या जिल्ह्यात केवळ ३५४ रुग्ण उपचार घेत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार