शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पालघर जिल्ह्यात २८५ बालविकास केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:53 IST

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.

हितेन नाईक पालघर : हा जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली.बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांना पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर या केंद्राद्वारे भर देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सेविका आणि आशा कार्यकर्तींसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन येथे करण्यात आले होते. त्यासाठी जि. प. महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पाटील, उप मुख्य कार्यकरी (साप्रवी) प्रकाश देवऋषी, पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे संपूर्ण जिल्हातून आलेल्या मुख्यसेविका, आशा ताई व संबंधित अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन, उंची, दंड घेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणार्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.केंद्रात द्यावयाच्या आहार व औषधांबाबत वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. या केंद्रामधील बालकांना दररोज तीन वेळा घरचा आहार, दोन वेळा अंगणवाडीतील आहार, तीन वेळा अंगणवाडीतील ग्राम बाल विकास केंद्राअंतर्गत दिला जाणारा विशेष आहार असा एकूण आठ वेळा आहार दिला जाणार आहे.>सेविकांना घ्यावी लागेल ही प्रतिज्ञामी एक अंगणवाडी सेविका अशी प्रतिज्ञा करते की, जी ग्राम बालविकास केंद्र अंगणवाडी स्तरावर सुरु झाली आहेत. त्यात सॅम आणि मॅम ने प्रभावित असलेल्या बालकांसाठी २ हजार १५० रु पये प्राप्त झाले आहेत. मी सर्वांच्या साक्षीने मासिक सभेमध्ये शपथ घेते की, मला माझ्या बालविकास केंद्रासाठी मिळालेल्या एकूण रकमेचा मी बालकांच्या आहार व औषधांसाठी १०० टक्के विनियोग करीन आणि अशी बालके सुदृढ करण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करून माझी अंगणवाडी कुपोषणमुक्त करेलच, असे मी आपणास आश्वासित करते. अशी प्रतिज्ञा सेविकांना घ्यावी लागणार आहे. या २८५ ग्राम बाल विकास केंद्रांपैकी डहाणू तालुक्यात ८५ , वसई तालुक्यात ९, वाडा तालुक्यात ३८ ्र, पालघर तालुक्यात १८ , जव्हार तालुक्यात ५५, विक्रमगड तालुक्यात ४३, मोखाडा तालुक्यात २६ तर तलासरी तालुक्यातील ११ केंद्रांचा समावेश आहे. आता ती कधी सुरु होतात व त्यांची फलनिष्पत्ती कशी असेल याकडे लक्ष लागले आहे.