शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर भर समुद्रात सर्व्हेला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:13 IST

च्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर : ओएनजीसीच्या सर्वेक्षणामुळे उत्तन, वसई ते झाई-बोर्डी दरम्यानची मासेमारी ठप्प पडली असून मच्छीमाराना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण लादले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी सर्व मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात नेऊन सर्वेक्षणा ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.१ जानेवारी पासून समुद्रात ओएनजीसीच्या पोलर मर्क्युस या महाकाय जहाजा द्वारे बी ६६ या भागात सर्वेक्षण सुरु आहे. हे जहाज ५ नॉटिकल माईल्स च्या वेगाने २४ तास समुद्र तळातील वायू आणि तेल साठ्यांचा शोध घेत आहे.२१ जानेवारी रोजी सातपाटी येथील पंकज म्हात्रे या मच्छीमारांच्या दिव्य लक्ष्मी बोटीला सर्वेक्षणातील एका महाकाय जहाजाने धडक दिल्याने त्याचे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले होते. राज्यपाल राम नाईक हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना मच्छीमाराना विश्वासात घेतल्या शिवाय ओएनजीसी अथवा इतर कंपन्या सर्वेक्षण करणार नाही असे आश्वासन मच्छीमार संघटनांना दिले होते. तसेच मच्छीमारांचे ५ सदस्य असलेली समिती ही नियुक्त करण्यात आली होती. मात्र, या समितीला विश्वासात न घेता सर्व्हे सुरु करण्यात आला. बुधवारी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सभागृहात नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उत्तन, वसई, अर्नाळा, भाटी, मढ, सातपाटी, मुरबे, नवापूर, दांडी, डहाणू, झाई-बोर्डी आदी भागातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत ओएनजीसीच्या सर्वेक्षणाला एकजुटीने विरोध करीत सर्वेक्षणा ठिकाणी जाऊन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी लोकमतला सांगितले. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी २५ जानेवारी ला पुन्हा सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.>कवचे मोठे नुकसान६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्सद्वारे हे सर्वेक्षण होणार असल्याने कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हजारो कवी उध्वस्त होऊन लाखो रु पयांचे नुकसान होणार आहे. तसेच. दालदा, वागरा, आदी मासेमारी जाळ्यांचेही मोठे नुकसान होणार असल्याने किनारपट्टीवरील मच्छिमारामध्ये मोठा प्रमाणात संतप्त भावना उमटत आहेत.