शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक 

By धीरज परब | Updated: February 23, 2023 18:11 IST

अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक करण्यात आली. 

मीरारोड : स्वतःची सदनिका असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती असून देखील बनावट पालिका बांधकाम नकाशा देऊन त्याची विक्री करून खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यास नवघर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने अनधिकृत इमारतीं मधील सदनिका खरेदी - विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. 

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव भागात हंसा बी ह्या इमारतीत मनीष व ज्योती भाटकर दाम्पत्याची सदनिका २०१४ सालात परेश व काजल नाईक ह्या दाम्पत्याने ३२ लाखांना नोंदणी करारनाम्याने खरेदी केली होती . सदर सदनिका खरेदीसाठी नाईक दाम्पत्याने बँकेतून २४ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते . गृहकर्ज साठी आवश्यक इमारतीचा मंजूर बांधकाम नकाशा व प्रारंभपत्र , भोगवटा प्रमाणपत्र , सदनिका खरेदी - विक्रीचे आधीचे मूळ करारनामे भाटकर यांनी दिल्यावर ती कागदपत्रे नाईक यांनी बँकेत दिली होती.  मंजूर नकाशा स्पष्ट नसल्याने बँकेने दुसरी प्रत मागितली असता भाटकर यांनी नाईक यांना दुसरी प्रत दिल्यावर बँकेने गृहकर्ज मंजूर केले. 

मात्र सदर इमारत २०१२  सालीच महापालिकेने अनधिकृत घोषित केली होती . ऑक्टोबर २०१६ मध्ये महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याने इमारतीतील सदनिकाधारकांना त्यांच्या कडील इमारतीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता सदनिका धारकांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले . विकासक विजय पाटील यांनी सदर बनावट कागदपत्रे बनवून सदनिका विकून लोकांची फसवणूक केल्या प्रकरणी रहिवासी वैशाली सचदेव यांच्या फिर्यादी वरून पाटील यांच्यावर २०१७ साली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पालिकेने इमारत तोडण्याची कार्यवाही प्रस्तावित केल्याने रहिवाश्यानी ठाणे न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली. नाईक दाम्पत्याने माहिती घेतली असता २०१२ साली मनीष भाटकर हे हंसा बी सोसायटीचे सचिव असतानाच इमारत अनधिकृत असल्याची नोटीस आली होती. त्यावेळी सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेतील कागदपत्रात अन्य रहिवाश्यांसह भाटकर यांची सुद्धा स्वाक्षरी होती. 

मनीष व ज्योती भाटकर यांना ते रहात असलेली इमारत अनधिकृत असल्याची माहिती असून देखील बनावट बांधकाम नकाशा आदी देऊन आपली फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्याची तक्रार काजल नाईक यांनी केली होती . गेल्यावर्षी एप्रिल मध्ये मनीष व ज्योती वर गुन्हा दाखल करण्यात आला. 

मात्र भाटकर दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली होती . तसेच सदनिका परत घेऊन ठराविक रक्कम नाईक याना देण्याची तयारी भाटकर दाम्पत्याने दर्शवली होती. मात्र ते देत असलेली रक्कम कमी असल्याने नाईक यांनी नकार दिला.  

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने मनीष भाटकर याला नवघर पोलिसांनी अटक केली. तर ज्योतीला अटके पासून दिलासा मिळाला आहे. सहायक निरीक्षक योगेश काळे हे पुढील तपास करत आहेत. इमारतीतील अन्य काही रहिवाश्यांच्या देखील अश्याच प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार आहे. 

 

टॅग्स :mira roadमीरा रोडArrestअटक