शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांना रंगेहाथ पकडून जमावाने दिला चोप; संतप्त जमावाकडून रिक्षांची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2023 12:04 IST

तीन चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसवरील इन्वर्टर व बॅटरी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला असता परीसरातील नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला.

- मंगेश कराळे

नालासोपारा :- नाळा गावातील एका बंद घरात चोरीसाठी घुसलेल्या चोरट्यांना नागरीकांनी पकडून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. संतप्त जमावाने चोरट्यांच्या रिक्षांची ही तोडफोड केली असुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नालासोपारा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले आहे.   नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाळा गावातील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिराजवळ रानेभाट रोड येथे मुख्य रस्त्यावर ग्रॅब्रीयल कोरीया यांचा बंगला आहे. ग्रॅब्रीयल कोरीया हे बोरीवलीत राहात असल्यामुळे त्यांचा बंगला सद्या बंद आहे. चोरट्यांनी या बंद घराची रेकी करुन दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील दोन सिलींडर, इन्वर्टर व बॅटरी, एसी युनीट व मुलांच्या पिगी बॅगेतील पैसे असा मुद्देमाल चोरून नेला होता. याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात ग्रॅब्रीयल कोरीया यांनी दिली होती. बुधवारी रात्री आठच्या सुमारास पुन्हा पाच चोरट्यांनी बंगल्यातील इतर सामान चोरण्यासाठी ते रिक्षा घेऊन आले होते.

तीन चोरट्यांनी बंगल्याच्या टेरेसवरील इन्वर्टर व बॅटरी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला असता परीसरातील नागरीकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यातील दोन चोरट्यांना पकडण्यात नागरीकांना यश आले तर उर्वरीत तीन जण पळून गेले. संतप्त नागरीकांनी त्यानंतर पकडलेल्या चोरट्यांपैकी एकाची यथेच्छ धुलाई केली. यात दुसरा पकडण्यात आलेला आरोपी अल्पवयीन असुन चोरी करणारे सर्वजण नालासोपारा टाकी रोड येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

संतप्त जमावाने त्यानंतर चोरट्यांनी आणलेल्या रिक्षाचीही तोडफोड केली. नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी आरोपीला नेण्यासाठी खाजगी वाहन आणले असल्यामुळे नागरीकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. अखेर नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सुपे यांनी अधिक पोलीस बळ सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली व परिस्थीतीवर वेळीच नियंत्रण मिळवले. याबाबत नालासोपारा पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी व कारवाई करत आहे.

टॅग्स :Robberyचोरी