शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वाडा अंतर घटविणाऱ्या पुलाचे काम अखेर झाले सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:10 IST

अंतर होणार कमी; मार्चला पूर्ण, २२ गावांतील विद्यार्थ्यांची सोय

वाडा : ठाणे व पालघर जिल्ह्यातील भिवंडी व वाडा तालुक्यातील काही गावांना जोडणाºया या तालुक्यातील उचाट या गावाच्या हद्दीत तानसा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर असून मार्चअखेर तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातील अंतर १५ कि.मी.ने कमी होणार असून विशेषत: भिवंडी तालुक्यातील २२ गावांतील मुलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे.उचाट या गावचे पुनर्वसन १९६२ मध्ये तानसा नदीकाठी झाले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अ‍ॅस्पी विद्यालयाची स्थापना केली. ती मध्ये पहिली ते बारावीपर्यंत तसेच इंग्लिश मिडीयमची शाळा असून एकूण बाराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे सुमारे ६५० विद्यार्थी हे भिवंडी तालुक्यातील सागाव, एकसाल, कुशापूर, माडोशी, सावरोली, देवचोळा, वापे, दुधणी, चिंचवली, दिघाशी, पाश्चापूर, कुंदे, खंबाळा, वेडवहाळ, बासे, मैंदे, शिरोळा, करमाळा आदी २२ गावांतील आहेत. मात्र तानसा नदीवर पुल नसल्याने पावसाळ्यात या विद्यार्थांना अंबाडी मार्गे कुडूस उचाट असा वळसा देऊन दहा बारा किलोमीटर चा फेरा घेऊन शाळा गाठावी लागत होती. या नदीवर उचाट येथे एक बंधारा असून या बंधा-यावरून विद्यार्थी प्रवास करीत असत. मात्र पावसाळ्यात पुराच्या वेळी या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत असे. या बंधा-यावरून पडून एका विद्यार्थांचा मृत्यूही झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे अनेक वर्षांपासून या नदीवर पुल व्हावा अशी मागणी उचाटवासीय करीत होते.येत्या फेब्रुवारी/मार्चपर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.- प्रकाश पातकर, शाखा अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग वाडायेथील पुलाला गेल्या वर्षी मंजूरी मिळून त्याचे काम जानेवारीत सुरू केले आहे. यासाठी २ कोटी दहा लाखांचा निधी मंजूर असून त्याचा ठेका आर. के. सावंत यांना देण्यात आला आहे. नाबार्ड योजनेतून तो मंजूर झाला आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारroad transportरस्ते वाहतूक