शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

ठाणे-पालघरच्या ३५ बोटी अद्यापही समुद्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:32 IST

कोलंबिया, माले बेटांकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी ठाणे-पालघरच्या समुद्रात धडकण्याची शक्यता आहे.

सुरेश लोखंडेठाणे : कोलंबिया, माले बेटांकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी ठाणे-पालघरच्या समुद्रात धडकण्याची शक्यता आहे. त्यातच, प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून सावधानतेचा इशारा देऊनही मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे- पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्यापही समुद्रात अडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किनाºयास लागण्याचे संदेश धाडण्यात आले आहेत. उशिरापर्यंत त्या पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्या किनाºयास लागेपर्यंत सर्वांचे लक्ष त्याकडे लागून आहे.सुमारे ४८ तासांच्या कालावधीत ओखी चक्रीवादळ गुजरात व मुंबईच्या समुद्रात धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यांतील मच्छीमाºयांच्या सुमारे एक हजार ३८४ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. यापैकी एक हजार ३४९ बोटी ठिकठिकाणच्या किनाºयांवर सुखरूप लागल्याचा दावा येथील मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तालयाकडून केला जात आहे. उर्वरित पालघर जिल्ह्याच्या ३४ मच्छीमार बोटींसह ठाणे जिल्ह्यातील एक बोट अद्याप समुद्रात अडकलेली आहे. परंतु, या सर्व बोटी सुखरूप असून त्या वेळीच किनाºयावर लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.ओखी या जीवघेण्या चक्रीवादळापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून हवामान खात्याच्या सूचनेनुसार किनारपट्टीलगतच्या गावांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिका, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक, तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणांनादेखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छीमाºयांसह सर्वांना कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तर, समुद्रातील बोटींना जवळच्या किनाºयावर लागण्याचा संदेश देऊन खातरजमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातून ६९० मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यातील ६८९ बोटी परत येऊन किनाºयास लागल्या आहेत. उर्वरित एक बोट देखील उत्तन बंदरात लागणार आहे. त्यातील खलाशी सुखरूप असल्याचे माहिती आहे. झाई, वरोर, आगर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू, घिवली, उच्छेळी, नवापूर, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, वडराई, टेभी, दादरपाडा, केळवे, माहीम, केळवा, एडवण, कोरे, दातिवरे, किल्लाबंदर (अर्नाळा), पाचूबंदर, नायगाव आणि खोचिवडे आदी पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून ६९४ मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यापैकी ६६० बोटी किनाºयास सुखरूपपणे लागल्या आहेत. समुद्रात पालघरच्या अडकलेल्या ३४ बोटी किनाºयावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डहाणू बंदारातील भाग्यसाई, मातोश्रीप्रसाद, व गणेश धानमेहेर यांची भाग्यसाई या तीन बोटी समुद्रात आहेत. याशिवाय, धाकटी डहाणूची धनवृद्धी, एडवन बंदरातील जयदत्तसाई ही बोट परत आलेली नाही. तर, डहाणू बंदरातील १८७ पैकी १५७ बोटी परत आल्या असून उर्वरित २९ बोटी परतलेल्या नाहीत.ढगाळ वातावरणाने तलासरीतील शेतकºयांची तारांबळसमुद्रातील ओखी वादळामुळे तलासरी परिसरात सोमवारी दिवस भर ढगाळ वातावरण होते. परंतु या वातावरणामुळे मात्र आदिवासी शेतकºयाची चांगलीच तारांबळ उडाली. आधीच अनियमित पावसामुळे शेतकºयांच्या हाती भाताचे अल्प उत्पन्न आले आहे. त्यातच सोमवारी ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल की, काय या भीतीने खळ्यात कापून ठेवलेला झोडणी साठी असलेले भात सुरक्षित ठेवताना चांगलीच तारांबळ उडाली.काहींनी भाताच्या गंज्या प्लास्टिक कापडाने झाकल्या तर काहींनी धावपळ करून आपली झोडणी आटोपून घेतली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे तलासरी आठवडा बाजारातही फारशी गर्दी पहायला मिळाली नाही.