शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात द्वारका हॉटेलला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2024 18:30 IST

आचोळे रोडवरील मंगळवारी दुपारची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहराच्या पूर्वेकडील आचोळे रोडवर असलेल्या द्वारका हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तिघांना मनपा रुग्णालयात आणि चौघांना एव्हरशाईन येथील आयसिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.

यातील दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर जखमी असल्याची माहिती आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी लोकमतला दिली. भीषण आग विझविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. आता या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. द्वारका हॉटेलमध्ये सिलेंडरचे ब्लास्ट झाल्याचे सूत्रांकडून कळते. नेमकी ही आग कशामुळे लागली याचा पोलीस तपास करत आहे. या हॉटेलच्या बाजूला नवीन गटार बांधण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू असताना गुजरात गॅस पाईप लाईन फाटल्यामुळे ही घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. घटनास्थळी मनपाचे अधिकारी वर्गही पोहोचला होता.

टॅग्स :nalasopara-acनालासोपारा