शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

बनावट सीसी वापरून बांधल्या दहा इमारती

By admin | Updated: January 6, 2016 00:56 IST

मुंबई हायकोर्टाचा आदेशानंतर बनावट सीसीचा गैरवापर करून दहा बहुमजली बेकायदा इमारती बांधणाऱ्या तीन बिल्डरांविरोधात वसई विरार महापालिकेने फिर्याद दिल्यानंतर

वसई : मुंबई हायकोर्टाचा आदेशानंतर बनावट सीसीचा गैरवापर करून दहा बहुमजली बेकायदा इमारती बांधणाऱ्या तीन बिल्डरांविरोधात वसई विरार महापालिकेने फिर्याद दिल्यानंतर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून दहा बंगले बांधण्यांची परवानगी घेतल्यानंतर परवानगीचा गैरवापर करुन बनावट सीसीच्या आधारे बंगल्यांऐवजी दहा चार मजली इमारती बांधल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय. शिवा रेडी यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन नालासोपारा पोलिसांनी रॉबर्ट तुस्कानो, हितेश जैन आणि मयूर शहा या तीन विकासकांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.८५/२०१५) दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने न्या. अभय ओक यांनी महापालिका प्रशासनासह नगररचना विभागाला संबंधीत बिल्डरांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेश निर्गमित केले होते. नालासोपारा पच्छिमेकडे वसई विरार मनपाने गास गाव, सर्व्हे नंबर ३५५, ३५६ (अ), ३५६(ब), ३५८/१ या जमिनीवर बिगरशेतीचा ना हरकत दाखला मिळाल्यानंतर व. वि .श. म.पा. / टीपी/सीसी/वीपी -५२४६/४९२ ते ५०२/२०१३ या परवानगीनुसार तळमजला अधिक एक मजला असे चौदा रहिवासी बंगले बांधण्याची परवानगी दिली होती. परंतु विकासक रॉबर्ट तुस्कानो, हितेश जैन आणि मयूर शहा यांनी मनपाकडून देण्यात आलेल्या प्रत्येक बांधकाम परवानग्यांमध्ये बंगलो ऐवजी बिल्डींग, मजल्यांची संख्या १ ऐवजी ४ तसेच फ्लॅटस व एरीयाच्या संख्यांमध्ये फेरफार केले. त्यानंतर बनावट सीसीच्या आधारे अन्य बिल्डरांशी डेव्हलमेंट करार करुन १० इमारतींचे बांधकाम केले. याविषयी नितीन पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.