शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना ४ महिने पगार नाही, आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:10 IST

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाº्या शाळांमधील शिक्षकांचे ४ महिन्यांपासून पगारच झाले नाहीत मात्र आदिवासी विकासमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड

पालघर : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाº्या शाळांमधील शिक्षकांचे ४ महिन्यांपासून पगारच झाले नाहीत मात्र आदिवासी विकासमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड तालुक्यातील शिक्षकांचे पगार मात्र वेळेवर झाले आहेत. या दुजाभावामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी डहाणू प्रकल्प अधिकाºयांना हे पगार २७ फेब्रुवारीपर्यंत न झाल्यास २८ पासून आंदोलाचा इशारा दिला आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत २२ प्राथमिक तर २३ माध्यमिक अशा एकूण ४५ अनुदानित आश्रमशाळा असून त्यामध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर शिक्षक व शिक्षकेत्तरांची संख्या ६२३ आहे. त्यांचे पगार मागील काही महिन्यांपासून आॅनलाइन पद्धतीने देणे सुरू झाल्यानंतर त्यात अनेक अडचणी निर्माण होत असून नोव्हेंबर महिन्यापासून ह्या सर्व शिक्षकांचे पगारच झालेले नाहीत.यावर उपाय योजना करावी यासाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोहोडकर, उपाध्यक्ष संजय भोये, सचिव प्रवीण भोईर यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आमदार अमित घोडा, डहाणू प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांना निवेदने दिली आहेत. मात्र कुठलीही कार्यवाही केली जात नाही. महत्वाचे म्हणजे आदिवासींचे तारणहर्ते असलेल्या आदिवासी विकासमंत्री सवरा यांच्या मतदार संघातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील आश्रमशाळांमधील शिक्षकांचे पगार मात्र वेळेवर होत असून डहाणू तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांवरच मात्र अन्याय का? असा प्रश्न आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असा दुजाभाव केला जातो आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती निलेश सांबरे यांच्याकडे शिक्षक संघटना व पालकांनी केल्या नंतर २७ फेब्रुवारी पर्यंत वरील शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न सुटला नाही तर २८ फेब्रुवारी पासून डहाणू प्रकल्प अधिकारी कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचे पत्र सांबरे यांनी दिले आहे.या संदर्भात प्रकल्प अधिकारी आँचल गोयल ह्यांच्याशी संपर्क साधला असता पुनर्नियोजनास प्रस्तावा मध्ये निधीची मागणी केली होती.ती मान्य झाली असून पगाराचा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.