शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात १.८६ कोटींचा टीडीआर घोटाळा

By admin | Updated: July 25, 2016 02:48 IST

वसई विरार महापालिकेच्या रस्त्याचा टीडीआर बिल्डरला विकून १ कोटी ८६ लाख रुपांचा घोटाळा नालासोपारातील वाळींजकर कुटुंबाने केल्याचे उघडकिस आले

वसई : वसई विरार महापालिकेच्या रस्त्याचा टीडीआर बिल्डरला विकून १ कोटी ८६ लाख रुपांचा घोटाळा नालासोपारातील वाळींजकर कुटुंबाने केल्याचे उघडकिस आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील सर्व्हे.क्र.३४ प्लॉट नं २८ मध्ये रस्त्याखाली गेलेली ५ हजार २३४ चौ.मी.ही जागा अंधेरी येथील चंद्रकांत वाळींजकर आणि कृष्णा वाळींजकर यांच्या मालकीची होती. सातबारा उताऱ्यावरही तशी नोंद होती.त्यातील सर्व्हे.क्र.३४/१ मधील रस्त्याखालील जमिनीच्या सातबाऱ्यात सोपाऱ्याच्या तलाठ्याला हाताशी धरून व फेराफार करून रमेश वाळींजकर, शांताराम वाळींजकर, प्रशांत वाळींजकर आणि भानुमती वाळींजकर यांनी स्वत:ची नावे चढवली. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत आणि कृष्णा वाळींजकर यांच्या नावाने बोगस कुलमुखत्यारपत्र आणि पॅन कार्ड बनवले. त्यासाठी चंद्रकांत आणि कृष्णा यांच्या नावाने तोतया माणसे उभी करून रजिस्ट्रेशनही केले. कृष्णा यांचा ५ जून २०१० ला मृत्यू झाला असतांनाही त्यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र बनवण्यात आले. ही जागा स्वत:च्या नावे केल्यानंतर वाळींजकर कुटुंबाने त्यातील ३४५१ चौ.मी.जागा महापालिकेला हस्तांतरीत केली. त्यामुळे पालिकेने त्यांना तितकाच टीडीआर दिला. हा टीडीआर शांताराम वाळींजकर यांनी विरार येथील महादेव गोपाळ पाटील,नालासोपारा येथील आदिराज लक्ष्मी डेव्हलपर्सचे निलेश पटेल आणि महावीर डेव्हलपर्सचे जितेंद्र जैन यांना १ कोेटी ८४ लाख रुपयांना विकला. ही बाब मूळ मालक चंद्रकांत वाळींजकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फसवणूक करणाऱ्या वाळींजकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.