शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जीवावर उदार होऊन जवानांनी विझविली तारापूरची आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 03:12 IST

अग्निशमन दलाच्या तत्परते मुळेच तारापूर एम आय डी सी मधील स्फोट व आगी नंतर निर्माण झालेला धोका टळला असलातरी त्यात पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली होती

- पंकज राऊतबोईसर : अग्निशमन दलाच्या तत्परते मुळेच तारापूर एम आय डी सी मधील स्फोट व आगी नंतर निर्माण झालेला धोका टळला असलातरी त्यात पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली होतीआग लागलेल्या व आगीमध्ये भक्षस्थानी पडलेल्या शेजारच्या पाच कारखान्या मधील मार्जिन स्पेसमध्ये पक्का व कच्चा माल यंत्र सामग्री ठेवल्याने तसेच अनिधकृत शेड उभारल्याने आग विझविण्यासाठी अग्नीशमनदलाला जागाच नव्हती त्यामुळे जीव धोक्यात घालून त्यांना ती विझवावी लागली.भीषण आगीमुळे कारखान्याच्या इमारतीचा भाग व यंत्रसामग्री कुठल्या दिशेने कोसळेल याचा अंदाजआगीच्या लोळा मुळे येत नव्हता त्यामुळे जीवावर उदार होऊनच अग्निशमन दलाच्या जवानांची आगीशी पहाटेपर्यंतची अथक झुंज सुरूच होती.आग नियंत्रणात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची खरी कसोटी होती. आत कुणी जिवंत असल्यास त्याची मुक्तता करण्याची त्या दृष्टीने कारवाईची चके्र फिरू लागली आतील तापमान प्रचंड होते तर आग व स्फोटा मुळे कमकुवत झालेल्या इमारतीमध्ये शिरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण होते परंतु तो ही धोका पत्करून अग्निशमन दलाचे जवान जेवढे शक्य होईल तेवढे आत शिरून शोध घेत होते.कारण स्फोट झालेल्या कारखान्यात किती कामगार कामावर होते व स्फोटा ची चाहूल लागताच किती जण सुखरूप बाहेर पडले किती जखमी झाले याचा ताळमेळ सांगायला कुणीही जबाबदार व्यक्ती समोर आली नव्हती त्या मुळे गोंधळाची परिस्थिती होतीच दरम्यानच्या काळात शेजारच्या आरती ड्रग या कारखान्या मध्ये तीन निष्पाप कामगारांचे मृतदेह आढळले होते. त्या मृतदेहांचा पोलिसांनी पंचनामा करून तारापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना करीता पाठविले तरी अजून कुणी कामगार जिवंत किंवा मृतावस्थेत आहे का ? याचा कसोशीने शोध घेण्याचा प्रयत्न अग्निशमन जवानांनी सुरूच ठेवला. दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजता आग आटोक्यात आली तरी संपूर्ण कारखान्यांमध्ये पाणी आणि फोम मारून कुलिंगचे काम सुरू ठेवून शुक्रवारी रात्री ८ वाजता ही कामगिरी संपवली. मात्र यावेळी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, उपविभागीय दंडाधिकारी विकास गजरे, तहसीलदार महेश सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी फतेसीह पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांचे सह पोलीस, महसूल, आरोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळ इत्यादी विभागाचे सुमारे १०० अधिकारी व कर्मचाºयांनची घटनास्थळी होते उपस्थित पोलीस निरीक्षक बिराजदार यांनी आपल्या कर्मचाºयांना घेऊन घटनास्थळी जाणारे सर्व रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवून बघायनच्या गर्दीवर नियंत्रण आणले रस्ते मोकळे ठेवल्यामुळे अिग्नशमन दलाच्या रिकाम्या होणाºया गाड्या ज्या वेळी पाणी भरण्यासाठी इतरत्र जात होत्या त्यांना अडचण झाली नाही पोलिसांनी जखमी ना हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली तर पाणी भरून देण्या साठी आय व्ही पी लिमिटेड, मानधना डाइंग, जी एम सिंथेटिक, नुपूर केमिकल , लोविनो कपूर इत्यादी कारखान्यानी मोलाची मदत केली त्या वेळी एम आय डी सीच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व आॅपरेटर ही जातीने हजर होते. सर्व यंत्रणेच्या टीम वर्कमुळेच आगीवर सहा तासात नियंत्रण मिळवता आले.