शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर अग्निकांडाची चौकशी, पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:21 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीतील नोव्हा फाईन स्पेशालिटीज या कंपनीतील रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्य होऊन परिसरातील पाच कंपन्यांनाही प्रचंड नुकसान झाले असून या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्परतेने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिलेत.

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील नोव्हा फाईन स्पेशालिटीज या कंपनीतील रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्य होऊन परिसरातील पाच कंपन्यांनाही प्रचंड नुकसान झाले असून या अग्निकांडाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्परतेने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिलेत.त्यांनी शुक्रवारी रात्री तारापूर औद्योगिक वसाहतीतील दुर्घटना स्थळाची पाहणी करून नंतर रुग्णालयातील जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार पास्कल धनारे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसिलदार महेश सागर, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी भेट देण्यापूर्वी पालकमंत्री सवरा यांनी टिमा सभागृहात सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी व प्रभावी यंत्रणा असावी असेही सांगितले त्यापूर्वी माजी राज्य मंत्री राजेन्द्र गावित यांनीही दुर्घटना स्थळाला भेट दिली.बीएआरसीच्या अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखलपंकज राऊतबोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीत मधील नोव्हा फाईन स्पेशालिटीज या कंपनीस गुरुवारी रात्री लागलेली भीषण आग विझविण्यासाठी तारापूर येथील भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरची (बीएआरसी) अग्निशमन गाडी (फायर टेंडर) त्वरीत उपलब्ध करून न देणाºया बीएआरसीच्या संबधितअधिका-यां विरोधात बोईसर पोलीस स्थानकात शुक्र वारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार बीएआरसी च्या अधिकाºयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच बोईसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दूरध्वनीद्वारे अग्निशमन दलाची गाडी पाठविण्यास सांगितले मात्र त्यांनी असे सांगितले की, मला वरिष्ठांना विचारावे लागेल त्यांच्या अनुमतीशिवाय मला काहीही करणे शक्य नाही. अशा प्रकारे प्रसंगाचे गांभिर्य लक्षात न घेता दुरुत्तरे दिल्याने पालघरचे जिल्हाधिकारी नारनवरे यांच्या आदेशा नंतर उपविभागीय दंडाधिकारी विकास गजरे यांनी गुन्हा दाखल केला.स्फोटानंतर लागलेल्या प्रचंड आगीमुळे परिसरात असलेल्या आरती ड्रग्ज, प्राची केमिकल्स, भारत रसायन, युनिमॅक्स यांना देखील आग लागलेली होती.या आगीची भीषणता पाहून ती आटोक्यात आणण्याकरीता वसई विरार महानगरपालिका, एम.आय.डी. सी., रिलायन्स इंडस्ट्रीज डहाणू यांच्या आगीच्या बंबांनी झुंज दिली तरी आग नियंत्रणात येत नव्हती त्यामुळे बीएआरसीकडे बंबाची मागणी केली होती. त्याचा अपवाद वगळता इतर सगळ्यांनी ती तत्परतेने पूर्ण केली होती.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात. अशा घटने दरम्यान या कायद्यानुसार जिल्हाधिकाºयांना विशेष अधिकार प्राप्त होतात. परंतु या घटनेनंतर बीएआरसीच्या संबंधित अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५६ व ५७ चा भंग केल्याने त्यांच्याविरु द्ध या कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे तर अशा प्रकारचा जिल्ह्यात पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने यासंदर्भात आता काय कारवाई होते त्या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाई संदर्भात बीएआरसीचे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे.