शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

परगावी जातांना घरांची घ्या काळजी

By admin | Updated: May 1, 2017 05:49 IST

सद्यस्थित परिक्षा व शाळां कॉलेजेसना सुटटी लागल्याने शहरवासिय मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जात आहेत. चोरांसाठी

विक्रमगड : सद्यस्थित परिक्षा व शाळां कॉलेजेसना सुटटी लागल्याने शहरवासिय मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जात आहेत. चोरांसाठी हा काळ सुगीचा ठरू नये याकरीता नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुटीचा मोसम म्हणजे चोरटयांसाठी सुगीचा काळ त्यामुळे सुटीची मजा लुटा पण त्याबरोबरच सावधगीरीही बाळगा, असा सल्ला विक्रमगडमधील पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. जनजागृती करुन चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनामार्फत दक्षतेचा सल्ला दिला जात आहे़ गेल्या काही महिन्यांत गुन्हयांचे विशेषत: घरफोडयांचे प्रमाण वाढले होते व त्या अनुषगांने गुन्हयांची उकल होवुन चोरटयांना जेरबंद केले आहे़ मात्र मुखत्वे सुटटीच्या दिवसात बरेच नागरिक बाहेर गावी जातात़ नेमकी हीच संधी साधून चोरटे आपला डाव साधत असतात़ चोरी झाल्यानंतर पोलिस प्रशासनाला लक्ष्य केले जाते़ मात्र चोरी होउ नये यासाठी नागरिकांनीही आधी स्वत:हुन काळजी घेणे, दक्ष राहाणे व बाहेर जातांना त्यांची खबर पोलिसांना देणे गरजेचे आहे़ असे पोलिसांचे म्हणणे आहे़ बाहेरगावी जाण्यापूर्वी दारे, खिडक्या काळजीपूर्वक बंद कराव्यात, वॉचमन नेमतांना त्याची संपूर्ण माहिती घ्यावी, शक्यतो विश्वासातील परिचयातील व्यक्तींनाच वॉचमन म्हणून नेमावे, भाडेकरु ठेवतांनाही तो पूर्वी कुठे राहात होता, त्याची सामाजिक पार्श्वभूमी याची माहिती घेउनच ठेवावा, दागीने, मौल्यवान वस्तू, बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवावेत, अशा महत्वाच्या सूचनाही पोलिस प्रशासनामार्फत देण्यांत आल्या आहेत़जनजागृतीच्या उददेशाने पोलिसांनी हाती घेतलेली ही मोहिम नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल व घरफोडयांचे प्रमाण कमी होईल,असा विश्वासही यावेळी व्यक्त केला़ (वार्ताहर)विक्रमगड व परिसरातील रहिवाशांनी सुटीत बाहेरगावी जाण्यापूर्वी प्रथम स्थानिक पोलिस कार्यालयात याची माहिती नोंदवणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर बाहेर गावी जाण्यापूर्वी आपल्या घराच्या दारे-खिडक्या काळीपूर्वक बंद कराव्यात, वॉचमन नेमतांना त्याची संपूर्ण पार्श्वभूमी, माहिती घ्या,भाडेकरु ठेवतांना त्याची पार्श्वभूमी माहिती करुन घ्या व त्याची नोंदही पोलिस कार्यालयात करा. प्रत्येकाने सतर्क राहीले पाहिजे़ मौल्यवान वस्तू, दाग-दागीने बाहेरगांवी जात असतांना घरात ठेवू नये, संशयीत व्यक्ती आढळल्यास त्याबाबत पोलिसांना सांगावे, आदी बाबी लक्षात घ्याव्यात़-विजय शिंदे, पोलिस निरिक्षक विक्रमगड