शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक अंड्यांवर कारवाई करा, पोलिसांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:47 IST

प्लास्टिक अंडी विकत असल्याचा आरोप करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी म्हणून गावक-यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

नालासोपारा : पश्चिमेकडील एका गावात गावकऱ्यांना विकण्यासाठी येणारे पाववाले आणि अंडीवाले हे प्लास्टिक अंडी विकत असल्याचा आरोप करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी म्हणून गावक-यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार अर्ज दिला आहे.प्लास्टिक अंडी विकणाºया एका विक्रेत्याला गावकºयांनी रंगेहात पकडले आणि त्याला त्या अंड्यांसह घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात नेले. प्लास्टिक अंड्यांचे व्हीडिओ काढून गावकºयांनी सोशल मीडियावर टाकून व्हायरल केले आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात रविवारी रात्री अंडी विकण्यासाठी आलेल्या विक्रेत्याला त्याची अंडी फोडून ती प्लास्टिकची असल्याचे उदाहरण दाखवून कुठून आणून विकता याबाबत विचारणा केली. त्याने समेळपाडा येथील ‘लकी एग’ येथून अंडी आणत असून इतर विक्रेतेही त्यांच्याकडूनच खरेदी करत असल्याचे सांगितले. तसेच हे विक्रे ते गास, निर्मळ आजूबाजूच्या गावात अंडी विकत असल्याचे बोलले जात आहे.यासंबंधीचे व्हीडिओ पाहिल्यावर अनेक तक्रारी दुकान मालकाकडे आल्यावर त्यांनीही बदनामी रोखण्यासाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.>प्लास्टिक अंडी विकणारे लोकांच्या आरोग्याशी खेळत असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कडक कारवाई करण्यासाठी नालासोपारा पोलिसांना लेखी तक्रार अर्ज केला आहे. तसेच समेळपाड्यातील लकी एग अंड्याच्या दुकान मालकाला बोलावून त्याचीही चौकशी पोलिसांनी करावी.- ग्रेगरी फरगोज, तक्र ारदार व गावकरी, गासयाबाबत लेखी तक्रार देण्यात आली असून ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाला संपर्क साधून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. - वसंत लब्दे, वरिष्ठपोलीस निरीक्षक, नालासोपारा