शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कारवाई करा! अन्यथा हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करु !, जिल्हाधिका-यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:15 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या टप-या १५ दिवसांत हटवा, असा आदेश देऊन तो अमलात न आणल्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करू

सुरेश काटेतलासरी : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथील उड्डाणपुलाखाली असलेल्या टप-या १५ दिवसांत हटवा, असा आदेश देऊन तो अमलात न आणल्यास नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीवरच कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्याने आता या टपºया हटणार हे निश्चित झाले आहे. हा मुद्दा लोकमतने काही महिन्यांपासून सतत ऐरणीवर आणला होता.यावेळी एनएचएचे अधिकारी दिनेश अग्रवाल, तहसीलदार विशाल दांैडकर, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सागर साळुंखे व पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते.उड्डाण पुलाखाली बेकायदा टपºया टाकण्यात येऊन या द्वारे चायनीज, वडापाव, मोबाईलच्या विक्रीसोबत अवैध धंदेही चालत आहेत. चायनीजच्या टपºयांवर धोकादायक पद्धतीने वापरले जाणारे सिलेंडर, काही टपºयांतून मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीती भरून देणे, पान पानाच्या टपरीवर उभे राहून टारगटांनी शाळा, महाविद्यालयात जाणाºया मुलीची छेड काढणे असे प्रकार सुरु आहेत.या बाबत लोकमतच्या ८ जानेवारीच्या हॅलो पालघर वसईच्या पुरवणीमध्ये ‘ब्रीज खालच्या टपºयांना एनएचएचा आशिर्वाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या टपºया काढण्याबाबत आमदार पास्कल धनारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले. मात्र, एनएचएचे अधिकारी व पोलीस यंत्रणा त्याची दखल घेत नव्हती. तहसीलकार्यालय व नगरपंचायतीने सुद्धा काखा वर केल्या होत्या. मात्र, लोकमत मधून प्रसिद्ध होणाºया वृत्ताची दखल जिल्हाधिकाºयांनी घेऊन संबंधित यंत्रणेची गुरुवारी बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कारवाईमध्ये वेळकाढूपणा व विलंब केल्यास संबधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.दोन वर्षा पूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी बांगर यांनी टपºया काढण्याचे आदेश दिले होते पण त्याला एनएचएच्या अधिकाºयांनी दुर्लक्षिले होते. त्यामुळे आत्ता या आदेशाची अंमलबजावणी कशी होते या कडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.कलेक्टरांंच्या आदेशानुसार पंधरा दिवसात सर्व टपºया काढण्याची कारवाई करण्यातयेईल,-दिनेश अग्रवाल, व्यवस्थापक ,(एन. एच. ए.)ही कारवाई एनएचएने करावयाची आहे. त्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात करण्यात येईल.- विशाल दौडकर, तहसीलदार, तलासरी