शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ते पाणी भरण्यास टँकर्सना मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:33 IST

गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.

शशी करपेवसई : गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे.मात्र, गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो शहरवासियांच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरलॉबीवर कारवाई करण्याकडे महापालिका आणि महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होतो आहे.गोखीवरे येथील मधुबन परिसरात मोकळा जागेत आणि डबक्यात साचलेले पावसाचे पाणी पाच पंप लावून टँकरद्वारे पिण्यासाठी पुरवण्यात येत असल्याची धक्कादायक बाब लोकमतने उजेडात आणली होती. गेल्या काही दिवसांपासून टँकरवाले हे दूषित आणि अक्षरश: घाण पाणी पिण्यासाठी म्हणून नवघर-माणिकपूर आणि नालासोपारा परिसरातील हजारो लोकांना विकत होते. पण, त्यावर वसई विरार महापालिका अथवा महसूल खात्याकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती.ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने आपला अधिकारी पाठवून पंचनामा केला. तर महसूल खात्याच्या एका तलाठ्याने जागेचा पंचनामा केला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाºया टँकरवाल्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. सध्या वसई विरार परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. अशावेळी महापालिका आणि महसूल खात्याकडून टँकर लॉबीवर कारवाई होणे अपेक्षित असतांना त्यांच्याकडून ती न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, येथील बिल्डरांनी एकत्रित येऊन मधुबन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठाले पाईप टाकून टँकर्सना पाणी भरण्यापासून मज्जाव केला आहे. तसेच पंप काढून टाकले आहेत. त्यामुळे सध्या टँकरद्वारे होणारा दुषित पाणी पुरवठा बंद झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे टँकर पाणी भरत असलेल्या डबक्याकडे जाणारा रस्ता नक्की कुणी बंद केला याची माहिती महापालिका आणि महसूल खात्याला नव्हती. हा रस्ता बिल्डरांनीच बंद केल्याची माहिती लोकमतने मिळविली.दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने नवीन नळकनेक्शन देणे बंद केले आहे. त्यामुळे वसई विरार परिसरात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यातूनच टँकर माफियांनी धुमाकूळ घातला आहे. दुषित पाणी पुरवठा करणाºया टँकर माफियांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केली आहे.