शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील सामन्यात तिरंगी लढतीच लक्षवेधी, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 03:21 IST

वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून गीतांजली कोळेकर, भाजपकडून निशा सवरा, काँग्रेस कडून सायली पाटील, बहुजन विकास आघाडीकडून अमृता मोरे तर माकपकडून गुलाब दाभाडे या रिंगणात आहेत. या पंचरंगी लढतीमध्ये ही शिवसेना, भाजप व काँग्रेस यामध्ये होणारी तिरंगी लढतच लक्षवेधी ठरणार आहे.

- वसंत भोईरवाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून गीतांजली कोळेकर, भाजपकडून निशा सवरा, काँग्रेस कडून सायली पाटील, बहुजन विकास आघाडीकडून अमृता मोरे तर माकपकडून गुलाब दाभाडे या रिंगणात आहेत. या पंचरंगी लढतीमध्ये ही शिवसेना, भाजप व काँग्रेस यामध्ये होणारी तिरंगी लढतच लक्षवेधी ठरणार आहे.वाडा नगरपंचायतीची सदस्य संख्या १७ असून नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले असले तरी खरी लढत ही भाजप, शिवसेना व काँग्रेस मध्येच होणार आहे. भाजपकडून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या आसमंत या संस्थेच्या माध्यमातून गेली तीन वर्षे समाजकार्यात आहेत. तर शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर यांनी लघुपाटबंधारे खात्यात सेवा बजावून दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.निशा सवरा व गीतांजली कोळेकर या दोन्ही आजी माजी आमदारांच्या मुली असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले आहे.काँग्रेसच्या सायली पाटील कॉलेज जीवनापासून समाजकार्यामध्ये असून सध्या त्या एका खासगी शाळेत अध्यापनाचे काम करीत आहेत. अमृता मोरे या सध्या शिक्षण घेत आहेत. हे सर्व उमेदवार मतदारांना परिचित असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.वाडा शहराला नागरी समस्यांनी ग्रासलेले आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या प्रमुख या समस्या सोडविण्यात भाजप, शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना अपयश आले आहे. या पक्षांना विरोधी भूमिका नीट बजावता न आल्याने शहराचा विकास खुंटलेला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार