शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नितीन भगतची हत्या झाल्याचा कुटुंबियांनी व्यक्त केला संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:03 IST

विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारी नितीन भगत (२४) या तरुणाचा मृतदेह आढळला असून त्याच्या कुुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

वसई : विरार पश्चिमेकडील अर्नाळा समुद्रकिनारी नितीन भगत (२४) या तरुणाचा मृतदेह आढळला असून त्याच्या कुुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.विरार पूर्वेकडील गोपचरपाडा येथे राहणारा नितीन भगत हा रिकव्हरीचे काम करायचा. रविवारी रिकव्हरीसाठी नितीन अर्नाळा परिसरात गेला होता. तेव्हापासून तो गायब होता. त्याच्या कुुटुंबियांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर स्वत: शोधमोहिम हाती घेतली. चार दिवस बेपत्ता असलेल्या नितीनचा मृतदेह गुरुवारी अर्नाळा समुद्रकिनारी मामाची वाडी येथे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नितीन रिकव्हरीसाठी घराबाहेर पडला होता. सव्वासहाच्या सुमारास अर्नाळा येथील भालचंद्र पाटील यांच्याकडे कलेक्शनसाठी गेला होता. मात्र, त्यांच्या घरी न जाता नितीनने त्यांना फोन करून सुभाष लेन येथे बोलावून घेतले होते. भालचंद्र पाटील नितीनला भेटायला गेले त्यावेळी दोन जण त्यांच्याशी गप्पा मारत होते. पैसे दिल्यानंतर पाटील आपल्या घरी निघून गेले होते. त्यानंतर नितीन बेपत्ता झाला होता.नितीनचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, कुटुंबियांनी नितीनची हत्या झाल्याचा संशय व्यक् केल्याने पंचनामा करून मृतदेह जेजे हॉस्पीटलमध्ये पाठवून दिला आहे. नितीन बेपत्ता झाला त्यावेळी त्याच्याजवळ कलेक्शनचे रोखपासष्ट हजार रुपये रोख आणि स्वत:कडील दहा हजार रुपये ७५ हजार रुपये होते. पण, मृतदेहाजवळ फक्त दोनशे रुपये आणि मोबाईल फोन आढळून आला आहे.त्यामुळे पोलिसांनी नितीनसोबत बोलणाºया दोन अज्ञात इसमांचा तपास सुरु केला आहे.