शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणाने मच्छीमार भिकेला; मासेमारीचे ५६ दिवस जाणार वाया, कवींचीही होणार हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:08 IST

१ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत.

- हितेंन नाईकपालघर : १ जानेवारी ते २५ फेब्रुवारी पासून समुद्रात ओएनजीसी च्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मच्छीमार संघटनांनी दर्शविलेला हा विरोध वरवरचा असल्याचे दिसून येत असून ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म सागरात विहारत आहेत. कवीच्या मारलेल्या हजारो खुंटामुळे आधीच मासेमारी क्षेत्र अपुरे पडत असून त्यात या सर्वेक्षणाची भर पडल्याने पालघर, डहाणूतील मच्छीमारांचे कंबरडेच मोडले जाणार आहे. पोलर मर्क्युस या महाकाय जहाजाद्वारे शेअर वॉटर या कंपनीकडून बी ६६ परिसरात ५ नॉटिकल माइल्सच्या गतीने २४ तास समुद्रातील तेल शोध सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण २४ तास कार्यरत असून या जहाजाच्या मागे ६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्स समुद्रातील तेलाच्या साठ्यांचा खोलवर शोध घेणार आहेत.या केबल्स जहाजाच्या पुढे ७ मीटर्स तर मागे ३० मीटर्स पाण्याखाली असणार आहेत. या जहाजाच्या पाठीमागे असणाऱ्या ६ हजार मीटर्स लांबीच्या केबल्स ना लाइट असणाºया टेलबोय लावण्यात आली असून हे जहाज निरंतर चालत राहणार असल्याने व या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्याना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याच्या सज्जड दम वजा सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महाकाय जहाजाच्या मार्गिकेत कोणी मच्छीमार येऊ नये म्हणून एक सहाय्यक जहाज, आणि २५ ते ३० गार्ड बोट बंदोबस्ताला ठेवण्यात आल्या आहेत.या सहाय्यक बोटीवर काही स्थानिक मच्छीमारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत वायरलेस सेटद्वारे सूचना देऊन मासेमारी करणाºया मच्छीमाराना या जहाजाच्या मार्गातून हुसकावून लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.समुद्रातील तेल सर्वेक्षणामुळे समुद्रिय पर्यावरणाची मोठी हानी होत असून जैवविविधता नष्ट होऊन माशाच्या अंड्यांवर त्याचा परिणाम होत आहे. प्रत्येक पावसाळ्यात किनारपट्टीवर लागणारे डांबर गोळे हे या तेल सर्वेक्षणा दरम्यान होणाºया उत्खननामुळे होत असल्याचा मच्छीमार संघटनांचा दावा आहे. या जहाजाला लावण्यात येणाºया महाकाय केबल मुळे समुद्रात रोवलेल्या अनेक कवींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून मासेमारीचे तब्बल ५६ दिवसांचे नुकसान होणार आहे.भरपाईचा वाद पुन्हा उफाळणारया सततच्या सर्वेक्षणातून होणाºया नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सन २००० पासून महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व अन्य संघटनांकडून केली जात आहे. मात्र ओएनजीसी कडून नुकसान भरपाई दिली जात नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे, असा यावेळीही हाच वाद नव्याने उफाळून येणार आहे.सध्या वसई, उत्तन भागातील करल्या डोली द्वारे कव मासेमारी करणाºया मच्छीमारांनी थेट जाफराबाद पर्यंतच्या समुद्रात कवी मारल्याने पालघर, डहाणू मधील मच्छीमारांना आपली जाळी समुद्रात टाकण्यासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने मासेमारीची क्षेत्र अपुरे पडत असल्याने हद्दीचा वाद वाढला आहे.यातच या सर्वेक्षणामुळे काही प्रमाणात मासेमारी साठी उरलेला मोकळ्या भागात आता ओएनजीसीच्या जहाजाकडून जबरदस्तीने सर्वेक्षण होणार असल्याने पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमार व्यवसायाचे आर्थिक कंबरडे मोडले जाणार आहे. त्यामुळे जगावे कसे? हा प्रश्न मच्छीमारांपुढे उभा ठाकला आहे.मच्छीमाराना विश्वासात घेऊन नंतरच समुद्रात सर्वेक्षण करण्यात यावे यासाठी राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना ओएनजीसी विभागात एक समिती नेमण्यात आली होती.मात्र ह्या समितीला विश्वासात घेतले जात नाही त्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी.- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, एनएफएफ.

टॅग्स :palgharपालघर