शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या धरणाला धोका?, ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:16 IST

विक्रमगड (पालघर) : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना सोमवारी रात्री विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत १२ पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले.

राहुल वाडेकरविक्रमगड (पालघर) : जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असताना सोमवारी रात्री विक्रमगड तालुक्यातील खुडेद अंतर्गत महालेपाडा, ठाकूरपाडा या व साखरे अंतर्गत १२ पाड्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता गेल्या तीन दिवसांपासून वाढली असून घरांना तडे गेले आहेत. हा प्रकार असाच कायम राहिल्यास याच तालुक्यात असणाºया मुंबई, भार्इंदर, वसई-विरार यांना पाणीपुरवठा करणाºया सूर्या धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता गावकºयांनी व्यक्त केली आहे. पण तालुक्यात भूकंप मापक यंत्र नसल्यामुळे त्याची तीव्रता कळू शकली नाही.गेल्या आठवड्यापासून खुडेद अंतर्गत गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मापक यंत्रणा उपलब्ध नसल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही घरांनाही तडे गेले आहेत, असे खुडेदमधील ग्रामस्थ शांताराम पांडू धूम यांनीसांगितले. सूर्या धरणालगत असणाºया गावपाड्यांना धक्के बसत असल्याने लोक रात्री घराबाहेर झोपत आहेत.>साखरे ग्रामपंचायत आणि खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावपाड्यांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याबाबत आम्ही पाहणी केली असता कुठलीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसून याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.- एस. सी. कामडी, निवासी तहसीलदार, विक्र मगड