शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईक हे शंभर टक्के सत्य - कर्नल रायकर

By admin | Updated: May 3, 2017 05:08 IST

सर्जिकल स्ट्राईक हे तथ्य आहे त्यात मिथ्य बिलकुल नाही. त्या भोवती मिथकं तयार झाली आहेत. डीजीएमओ नी पत्रकार

विरार : सर्जिकल स्ट्राईक हे तथ्य आहे त्यात मिथ्य बिलकुल नाही. त्या भोवती मिथकं तयार झाली आहेत. डीजीएमओ नी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली हीच एक मोठी खात्री आहे. लष्कराने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे असं प्रतिपादन निवृत्त कर्नल शैलेश रायकर यांनी वसई येथे संजीवनी व्याख्यानमालेत सर्जिकल स्ट्राईक तथ्य की मिथ्य या विषयावर बोलताना केलं. दहशतवादी केंद्र चालविल्याची कबुली दिल्या सारखे होईल म्हणून पाकिस्तान हे स्ट्राईक्स झाल्याचे नाकारते आहे अशी सुरूवात करून त्यांनी सांगितलं की सर्जिकल हा वैद्यकीय शब्द आहे. जगातील कोणत्याही लष्कराच्या पाठयपुस्तकात सर्जिकल स्ट्राईक असा शब्द नाही. एखादं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कमीत कमी वेळेत व कमीत कमी संसाधन वापरून केलेला हल्ला म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. रुडयार्ड किपलींगने सागिंतलेल्या सहा प्रश्नांची चौकशी आपल्याला सत्य उलगडायला मदत करेल. ते सहा प्रश्न म्हणे कोणी ? कधी ? कुठे? काय ? कसं ? आणि का ? चार प्रश्नाची उत्तर आपल्या सर्वांना माहित आहेत, भारतीय सेनेने २९ सप्टेंबर २०१६ ला हॉट्सपिंग या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सेनेने एलओसी पलीकडील पाक सरहद्दीत घुसून ७ दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. योजना अंमलात आणताना काय काय आणि कशी कशी काळजी घेतली जाते हे त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. सरकारने ठरविले तर दहशतवादी कारवाया थांबण्यासाठी आम्ही काय करू शकतो? याची चुणूक पाकिस्तानला दाखविण्यासाठी हे स्ट्राईक केले गेले. या अगोदरही सर्जिकल स्ट्राईक झाले आहेत. परंतु त्याला प्रसिद्धी दिली गेली नाही उदा. भारतीय सेनेनी २०१५ साली ब्रह्मदेश सरहद्दीवर असे स्ट्राईक्स् केले होते, असे ते म्हणाले. (वार्ताहर)