शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘वाढवण बंदर होणारच’ मुळे संतापाची लाट

By admin | Updated: July 24, 2015 03:36 IST

केंद्रसरकार आणि जेएनपीटी दरम्यान डहाणू तालुक्यात वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला असून तेथे बंदर होणारच अशी

वसई-पालघर : केंद्रसरकार आणि जेएनपीटी दरम्यान डहाणू तालुक्यात वाढवण येथे बंदर उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला असून तेथे बंदर होणारच अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबतच्या लक्षवेधीवर निवेदन करताना गुरुवारी विधान परीषदेत केल्याने या संपूर्ण किनारपट्टीत संतापाची लाट उसळली आहे. १९९७-९८ मध्ये भूमीपुत्रांचा या बंदराला असलेला विरोध पाहून युती सरकारचा रिमोटकंट्रोल असलेल्या शिवसेनाप्रमुखांनी हे बंदर रद्द करायला लावले होते. आता १९ वर्षांनी त्याचे भूत पुन्हा एकदा युती सरकारच्याच काळामध्ये जागवले गेल्याने भूमीपुत्र संतप्त आहेत. ज्या भाजपला कधीही डहाणूत पाय रोवता आले नाही. तिथे आम्ही भाजपला आमदार मिळवून दिला. पालघरची आमदारकी आम्ही शिवसेनेला पुन्हा मिळवून दिली. त्याचे हे पांग युती फेडते आहे काय? आज शिवसेनाप्रमुख असते तर हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची हिंमत युती सरकारने दाखवली असती काय? व शिवसेना कार्यप्रमुख याबाबत मौन धारणकर्ते झाले असते काय? असे सवाल भूमीपुत्रांनी उपस्थित केले आहेत.येथील सागरीहद्द पाकिस्तानच्या अत्यंत जवळ आहे, सागरी आणि मत्स्य संपदेने संपन्न असलेल्या या किनारपट्टीची ही संपन्नता नव्या बंदरामुळे नष्ट होईल, बागायती आणि शेती यावर बंदरामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा विपरीत परीणाम होईल, तसेच तारापूर येथे अणुउर्जा प्रकल्प आहे, हे लक्षात घेऊन हे बंदर होऊ देऊ नये एकीकडे या परिसरात उद्योगबंदी आहे आणि दुसरीकडे असलेल्या पारंपारीक रोजगार उद्योगांवर या बंदरामुळे कुऱ्हाड कोसळणार आहे, असे असताना या बंदराचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल येथील भूमीपुत्रांनी केला आहे. माजी आदीवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर यांनी त्याचप्रमाणे शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांनीही या बंदराला अगदी प्रारंभापासून विरोध केला आहे. त्यांनीही आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. १९९७-९८ मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सरकार असताना ‘अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र’ या परीषदेत आॅस्ट्रेलियाच्या ‘पी अ‍ॅण्ड ओ’ या कंपनीला वाढवण बंदर विकसीत करण्याचे इरादापत्र तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्याला असलेला विरोध लक्षात आल्यानंतरही ते साकारण्याचा हट्ट युती सरकारने कायम ठेवला तेव्हा शिवसेनेने ३५ हजार भूमीपुत्रांच्या सह्या असलेले निवेदन देऊन हे बंदर रद्द करण्याची मागणी केली होती. ती शिवसेना प्रमुखांनी मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा हे बंदर साकारणीचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्रीही सेनेचे आणि त्याला विरोध करणारे पालघर जिल्हा संपर्क प्रमुखही सेनेचे अशी जुंपली आहे.