शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचे कार्यालय पालघर की डहाणूत?

By admin | Updated: December 10, 2015 01:45 IST

पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत.

शोकत शेख,  डहाणू पालघर तालुक्यातील सुर्यानगर येथून शहापूर येथे हलवलेले सूर्याच्या प्रकल्पाचे कार्यालय बड्या प्रयत्नांनी पुन्हा पालघर जिल्हयात आणले जाणार आहेत. सूर्याच्या नदीवर बांधण्यात आलेले कवडास आणि धामणी ही दोन्ही धरणे पालघर जिल्हयात असूनही त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय मात्र शहापूर येथे असल्यामुळे शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी शहापूरला जावे लागत होते. सूर्या नगर येथे केवळ उपअभियंता यांचेच कार्यालय होते. त्यामुळे त्यांना मर्यादित अधिकार असल्यामुळे गळती, पाटाची दुरुस्ती देखभाल यावर अनेक बंधने येत होती. परिणामी सूर्यांच्या कालव्यांना ठिकठिकाणी भगदाडे पडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी शहापूर येथील हे कार्यालय डहाणू अथवा पालघर येथे स्थलांतरीत करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हे कार्यालय पुन्हा पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत असून १ जानेवारी रोजी हे कार्यालय मनोर येथे स्थलांतरित होणार असल्याचे वृत्त आहे. पाटाला अनेक भागात भगदाड पडल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित होते. या बाबीबरोबर वेळोवेळी वृत्ते प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन पाटाची बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. तसेच १५ डिसेंबरपासून सूर्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कार्याकारी अभियंता दुसाणे यांनी आपल्या अधिकारीवर्गासह प्रत्यक्ष. पाहणी केली असून त्यांनी कालव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.