शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात बळीराजाला भातखरेदी केंद्राचा आधार; शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 01:09 IST

क्विंटलमागे दर तसेच बोनसमध्येही होणार वाढ; जिल्ह्यात २९ केंद्रांची व्यवस्था

- सुनिल घरत पारोळ : सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरणार आहे. यंदा आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटल मागे दरात आणि देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने यंदा ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी आहे.गेल्यावर्षी क्विंटलमागे १७५० आणि बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण यंदा दरात वाढ होत १८५० तसेच बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही आनंदवार्ता आहे.भात पीक घेणे आता शेतकऱ्यांसाठी महागडे ठरत असून बी बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवतात तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेऊन भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटलमागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकºयांची मोठी पिळवणूक करतो. मात्र, आता ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.धान विक्रीसाठी ७/१२ उतारा, गाव नमुना ‘८ अ’ ची मूळप्रत, शेतकºयांचे बँकेतील खाते पुस्तक, आधारकार्ड, ही कागदपत्रे शेतकºयांना आधारभूत खरेदी केंद्रावर दाखवावी लागणार असून भात खरेदी केल्यानंतर काही दिवसातच शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि बोनसही वेगळा मिळेल.पालघर जिल्ह्यात वाडा, पालघर, विक्रमगड, डहाणू, वसई आणि तलासरी या तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर भात पीक घेतले जाते. यंदा जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतातील पीक आणि तण वाया गेले. नुकसान मोठे पण भरपाई तुटपुंजी मिळाली.त्यामुळे तयार झालेल्या भात पिकाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्ह्यात भात खरेदी केंद्रे सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. त्यानुसार राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय, जव्हार अंतर्गत जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजना केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.केंद्रे ठरणार शेतकºयांसाठी आधारजव्हार तालुक्यात २, विक्रमगड तालुक्यात ५, मोखाडा तालुक्यात ४, वाडा तालुक्यात ८, डहाणू तालुक्यात ४, तलासरी तालुक्यात २, पालघर तालुक्यात २, वसई तालुक्यात २ अशी पालघर जिल्ह्यात एकूण २९ आधारभूत खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही आधारभूत खरेदी केंद्रे शेतकरी वर्गाला मोठी आधार देणारी ठरणार असून शासनाने केलेली दरवाढ ही येणाºया नववर्षाची भेट आहे.